बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरची लहान बहिण अंशुला कपूरने नुकतेच इंस्टाग्रामवर एक स्पेशल पोस्ट शेयर केली आहे ज्याला लोक खूप पसंद करत आहेत. अंशुला लोकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या बॉडीला स्वीकार करण्यासाठी प्रेरित करत आहे. अंशुलाने आपला एक बिकिनी फोटो शेयर केला आहे ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कि ती पूलमध्ये पाय सोडून बसली आहे.

अंशुला कपूरने शुक्रवारी सकाळी सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. तिने ब्लू कलरचा बिकिनी सेट घातला आहे ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. उन्हाचा आनंद घेत असलेल्या अंशुलाचा हा फोटो चाहत्यांना खूपच पसंद येत आहे.

हा फोटो शेयर करताना अंशुलाने लिहिले आहे कि पहिला मी स्विमसूट घालण्यासाठी इतकी कॉन्फिडेंट नव्हती. ३ महिन्यांपूर्वी मला आठवते कि मी @priyamganeriwal सोबत पोहण्याचा आनंद घेत होते. मी म्हणाले होते कि कि कधीच बिकिनी घालणार नाही.

अंशुला पुढे लिहिते कि मी संकोच करत होते, कारण मला हा विचार करण्याची सवय आहे कि कपडे घालण्यासाठी मला स्पेशल बॉडी टाईपची गरज आहे. हीच विचारसरणी बदलण्याचे मी शिकत आहे. मी माझ्या बॉडीसोबत सहज होणे शिकत आहे. अंशुलाने पुढे लिहिले कि मला आनंद आहे कि मी बिकिनी खरेदी केली. हे माझ्या सुट्ट्यांमधील आवडत्या कामापैकी एक होते. मी कॉन्फिडेंट करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anshula Kapoor (@anshulakapoor)

अंशुला कपूरने काही दिवसांपूर्वी आपल्या बॉडी ट्रांसफॉर्मेशनने सर्वांनाच हैराण केले होते. तिने आपले खूपच वजन कमी केले होते. तर अंशुलाने आपल्या व्हेकेशनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील शेयर केले होते. ती नेहमी आपल्या इंस्टाग्राम पेज बॉडी पॉजिटिविटीवर पोस्ट शेयर करत राहते.