बॉलीवूड फिल्मी जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसोबत लग्न करून आपला संसार थाटला आहे आणि दोघे एकत्र खूपच खुश आहेत. जेव्हा नुश्काने विराट कोहली सोबत लग्न केले होते तेव्हा तिचे वय फक्त २९ वर्षे होते. पण सर्वांच्या मनामध्ये नेहमी हा प्रश्न येतो कि कमिटमेंट झाली होती तर अनुष्काने लग्नाची इतकी घाई का केली होती? नुकतेच अभिनेत्री अनुष्काने एका मुलाखतीमध्ये याचा खुलासा केला आहे.अभिनेत्री अनुष्का शर्माने फिल्मफेयरसोबत झालेल्या एका बातचीतमध्ये म्हंटले कि आमची ऑडियंस आमच्यासोबत इतकी जास्त जोडली गेली आहे जितकी इंडस्ट्री पण जोडली गेलेली नाही. ऑडियंसला कलाकारांना फक्त स्क्रीनवर पाहायला असते. त्यांना वैयक्तिक आयुष्याशी काही देणेघेणे नसते.
त्याचबरोबर अनुष्काने पुढे म्हंटले कि त्यांना फरक नाही पडत कि तुमचे लग्न झाले आहे का नाही किंवा तुम्ही आई बनला आहात. आपल्याला या पू’र्वा’ग्र’हा’तून बाहेर पडणे आवश्यक आहे. मी २९ व्या वर्षी लग्न केले जे एका अभिनेत्रीसाठी खूपच कमी वय आहे. मी असे केले कारण मला प्रेम झाले होते आणि मी त्याच्यावर प्रेम करते. लग्न एक अशी गोष्ट आहे जी नात्याला पुढे घेऊन जाते. मी नेहमी या बाजूने उभी आहे कि स्त्रियांना समान वागणूक दिली गेली पाहिजे.
तिने म्हंटले कि, माझी इच्छा नव्हती कि आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जगताना माझ्या मनामध्ये जरादेखील भीती असावी. जर एखाद्या व्यक्तीला लग्न केल्यानंतर काम करताना कोणतीही भीती वाटत नाही तर महिलांच्या बाबतीत असे का नाही झाले पाहिजे? अनुष्काने म्हंटले कि तिला आनंद आहे कि इतर अभिनेत्री देखील असे करत आहेत.
जे प्रेम करत आहेत ते समोर येत आहेत आणि त्याचा स्वीकार करत आहेत. अनुष्का शर्मा झिरो चित्रपटामध्ये शाहरुख खानसोबत शेवटची पाहायला मिळाली होती जो फ्लॉप झाला होत. त्यानंतर ती चित्रपटांपासून दूर गेली.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.