कोरोना व्हायरसच्या महारामारीचा संपूर्ण देश सामना करत आहे. या व्हायरसचा परिणाम आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील पाहायला मिळत आहे. आता चित्रपटांच्या शुटींगसाठी काही गाईड लाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. सोशल डिस्टेंसिंग, सेनेटाइजेशन आणि मास्क सोबत लोकांच्या संख्येवर देखील लगाम लावला गेला आहे.

अशामध्ये चित्रपट निर्मात्यांसाठी सर्वात चिंतेची गोष्ट हि असेल कि चित्रपट क्षेत्रामध्ये ट्रेंड बनलेले इंटीमेट सीन्स आता कसे शूट केले जाणार. सोशल डिस्टेंसिंगच्या कारणामुळे किस तर दूर पण आता जवळ देखील जाने खूपच धोकादायक आहे. यादरम्यान नुकतेच अभिनेता अपारशक्ति खुरानाने फोटो शेयर करून सांगितले आहे कि कोरोनाच्या काळामध्ये चित्रपटांचे इंटीमेट सीन कसे शूट होणार.

लॉकडाउननंतर मिळालेल्या शिथिलतेनंतर आता चित्रपटांची शुटींग सुरु होणार आहे. पण प्रश्न हा येत आहे कि गाइडलाइन्स नुसार जास्त गर्दी असलेले सिन्स आणि खास करून रोमँटिक सीन कसे शूट केले जाणार. यादरम्यान अपारशक्तिने एक फोटो शेयर करून लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्याने आपल्या आगामी चित्रपटामधील एका इंटीमेट सीनचा फोटो शेयर करून सांगितले कि सीन कसा शूट होईल. इथे पहा फोटो.अपारशक्तिचा नवीन चित्रपट हेलमेटला प्रदर्शित करण्याची तयारी सुरु केली जात आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेता मोहनीश बहलची मुलगी प्रनुतन बहल पाहायला मिळणार आहे. अपारशक्तिने जो फोटो शेयर केला आहे त्यामध्ये प्रनूतन देखील पाहायला मिळत आहे. या पोस्टमध्ये दोन फोटो आहेत, एक नॉर्मल इंटीमेट सीन आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेता-अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर फेस शिल्ड लावलेली आहे. म्हणजेच अपारशक्तिचे मानणे आहे कि आता इंटीमेट सीन फेस शील्ड लावून शूट केले जाणार आहे. तथापि हा तर फक्त अपारशक्तिचा विनोद आहे पण इंटीमेट सीन संबंधित समस्या अजूनदेखील कायम आहे.
तथापि, आपल्या चित्रपटासाठी अपारशक्ति निश्चिंत आहे, का? हे त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये सांगितले आहे. इंस्टाग्रामवर हा फोटो शेयर करताना अपारशक्तिने लिहिले आहे – बरे झाले कि चित्रपटाचा हा सीन कोरोनाच्या येण्याअगोदर शूट केला गेला होता. जर हा सीन आजच्या काळामध्ये शूट झाला असतात तर आम्हाला प्रोटेक्शनची आवश्यकता पडली असती. प्रोटेक्शनचा अर्थ आहे मास्क. अपारशक्ति खुराना, प्रनूतन बहल, आशीष वर्मा आणि अभिषेक बनर्जी अभिनित हेलमेट या चित्रपटाचे दिग्दर्शन सतराम रमानीने केले आहे.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.