बॉलीवूडची हॉट अभिनेत्री मलाइका अरोड़ा आणि अर्जुन कपूरचे नाते आता कोणापासून लपलेले नाही. मलाइका अरोड़ा देखील आपल्या नात्यावर उघडपणे वक्तव्य करत असते. ती अनेक वेळा म्हणाली आहे कि अर्जुनने तिला वाईट काळामध्ये साथ दिली होती.

तसे अभिनेता अर्जुन कपूर मलाइका अरोड़ापेक्षा वयाने खूप लहान आहे. यामुळे अनेक वेळा त्याला ट्रोल देखील केले जाते. पण त्याला याने काहीच फरक पडत नाही. ते नेहमी एकमेकांसोबत वेळ घालवत असताना पाहायला मिळतात. यादरम्यान अर्जुनचे काका अभिनेता अनिल कपूरने या नात्यावर आपली बाजू मांडली आहे.मलायका-अर्जुनच्या नात्यावर खुश आहे कुटुंब :- बऱ्याच काळापासून अशा बातम्या होत्या कि अर्जुनचे कुटुंब या नात्यावर खुश नव्हते. पण अनिल कपूरने यावर मौन सोडताना असे वक्तव्य केले आहे कि ज्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. अनिलने म्हंटले कि सर्व लोक अर्जुन आणि मलाइकाच्या नात्यावर खूप खुश आहेत. अनिलने सांगितले कि मी अर्जुनला लहानपणापासून ओळखतो. तो कधीच चुकीचा निर्णय घेत नाही. हे त्याचे वैयक्तिक आयुष्य आहे. अर्जुनला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो आम्ही देखील त्यावर खुश आहे.

अर्जुनला मिळाला काकाचा सपोर्ट :- अनिल कपूर पुढा म्हणाला कि कुटुंबातील सर्व सदस्य यावर विश्वास ठेवतात. त्या गोष्ट ज्यामुळे इतरांना आनंद मिळतो त्यावर आम्ही देखील खुश राहतो. दुसऱ्यांच्या आनंदामध्येच आपल्याला आनंद मिळतो. मी खूपच खुश आहे आणि मी यावर कोणतेही भाष्य करू शकत नाही.बऱ्याच काळापासून अर्जुनला डेट करत आहे मलाइका :- मलाइकाने अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अर्जुनला डेट करायला सुरुवात केली होती. मलाइकाला एक मुलगा देखील आहे आणि तो तिच्यासोबतच राहतो. आता ती अर्जुन सोबत रिलेशनमध्ये आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या मलाइका एक डांस रियालिटी शोला जज करत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ती कोरोनामधून बाहेर आली आहे. तर अर्जुन कपूर एक रोमँटिक चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.