बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी बांद्रा स्थित आपल्या राहत्या घरी आ*त्म*ह*त्या केली. त्याने उचलेल्या या पावलाने देशभरामध्ये शोक व्यक्त केला जात आहे. बॉलीवूड कलाकारांनी ट्विटरवर ट्वीट करून त्याला श्रद्धांजली दिली. राजकारणातील आणि क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींनी देखील त्याला श्रद्धांजली दिली आहे. बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरने देखील त्याला श्रद्धांजली दिली. अर्जुन कपूरने सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली देण्यासोबतच व्हॉट्सऍपवर केलेल्या त्याच्यासोबतच्या शेवटच्या संभाषणाचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे.अर्जुनने शेअर केले १८ महिन्यापूर्वीचे व्हाट्सएप चॅट :- अर्जुन कपूरने सुशांत सिंह राजपूत सोबत जे व्हाट्सएप चॅट शेअर केले आहेत ते १८ महिन्याअगोदरचे आहे. अर्जुन कपूरने स्वत: आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ही माहिती दिली आहे. अर्जुनने इंस्टाग्राम वर लिहिले आहे की १८ महिन्यापूर्वी माझ्यासाठी त्याचा शेवटचा संदेश होता. जेव्हा त्यांने केदारनाथ चित्रपटाच्या रिलीजच्या एका आठवड्यानंतर आपल्या आई विषयी पोस्ट केली होती.तो आपल्या आईची खूप आठवण काढत होता. त्यावेळी त्याच्या चित्रपटाची शूटिंग सुरू होणार होती आणि सर्व लोक जल्लोष साजरा करत होते. मी त्यावेळी त्याला चांगले ओळखत नव्हतो पण यशराज फिल्म्स, इवेंट्स स्क्रिनिंग दरम्यान तो मला भेटला जरूर होता.त्याने पुढे लिहिले आहे कि सुशांतचे असे पाऊल उचलण्यामागच्या त्याच्या भावना मी समजू शकतो. कारण मी ही त्या वेदना समजू शकतो ज्या सुशांतने आपल्या आईला गमावल्याबद्दल आणि त्याच्या एकांतवासात त्याने अनुभवल्या आहेत. अर्जुनने लिहिले आहे कि, आता मला आशा आहे कि माझा मित्र एका उत्कृष्ठ आणि आनंदी जगामध्ये आहे. मला हि सुद्धा आशा आहे कि त्या ठिकाणी त्याला जरूर शांती मिळत आहेत.
आम्ही सर्व आश्चर्यचकित आणि दुखी आहोत आणि हाच विचार करू कि आज हे काय झाले आहे. मी फक्त आशा करू शकतो कि जेव्हा हा तमाशा बंद होईल आणि आम्ही एका समाजाप्रमाणे समोर येऊ तेव्हा याची जाणीव होईल कि तू हे पाऊल कोणत्या कमजोर क्षणामुळे उचलले आहे ना हि प्रोफेशनमुळे. माझा प्रेमळ भाऊ सुशांतच्या आत्म्याला शांती मिळो.