बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानने कोरोनाच्या लढाईमध्ये उदारतेने हातभार लावला आहे. शाहरुखने बऱ्याच मोठ्या घोषणा केल्या आहेत. शाहरुखने दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि बिहारमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चैरिटीची घोषणा केली आहे. शाहरुख खानच्या या कर्तुत्वाबद्दल सगळीकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सोशल मिडियावर प्रत्येकजण शाहरुखच्या उदारपणाचे कौतुक करत आहे. यादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालने सुद्धा शाहरुखच्या या कृत्त्याबद्दल त्याचे आभार मानले आहेत ज्याचे उत्तर शाहरुखने आपल्या वेगळ्या शैलीमध्ये दिले आहे. शाहरुखने लिहिले आहे कि सर तुम्ही तर दिल्लीवाले आहात. आभार मानू नका, आज्ञा करा. आपल्या दिल्लीच्या बांधवांसाठी मी नेहमी तत्पर आहे. जर देवाची इच्छा असेल तर आपण सर्वजण या संकटातून मुक्त होऊ.शाहरुखने यावेळी कोरोनासाठी लढा देत असणाऱ्या सर्व टीमचे कौतुक देखील केले. दरम्यान आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सुद्धा शाहरुख खानचे आभार मानले आहेत ज्याचे उत्तर देताना शाहरुख म्हणाला कि अशा प्रसंगी आपण एकमेकांचे आभार मानत बसणे योग्य नाही. आपण सर्व एक कुटुंबातील आहोत. तुम्ही सर्वजण महाराष्ट्रासाठी एवढे मोठे काम करत आहात याबद्दल मी कृतज्ञ आहे.गुरुवारी शाहरुखने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हि घोषणा केली कि त्याची आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्स पीएम फंडमध्ये योगदान करणार आहे. तर त्याचबरोबर शाहरुखची एनजीओ पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र सरकारला ५०००० पीपीआई किटचा पुरवठा करणार आहे.याआधी शाहरुखवर सर्व स्तरावरून टीका होत होती कि तो सध्या कोरोनाच्या लढाईमध्ये आपले योगदान का करत नाही आहे. पण ज्यावेळी त्याने हि घोषणा केली कि अनेक ठिकाणी मदत करत आहे तेव्हा त्याच्यावर त्याच्या चाहत्यांकडून खूपच कौतुकाचा वर्षाव होत आहे.