शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघांचे कुटुंब एकमेकांच्या खूप जवळ आहे आणि दोन्ही स्टार्सची मुले देखील एकमेकांच्या खूप जवळ आहेत. अनन्या, आर्यन खानची देखील चांगली दोस्त आहे. पण सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर सर्वजण हैराण होत आहेत. वास्तविक एका इवेंटमध्ये आर्यन आणि अनन्या उपस्थित होते. अनन्या एका बाजूला उभी आहे तर आर्यन दुसऱ्या बाजूला उभा आहे.

नंतर अनन्याला न भेटता दुसरीकडे बघून आर्यन पुढे निघून जातो. हा व्हिडीओ व्हायरल भैयानीने शेयर केला आहे. व्हिडीच्या कमेंटमध्ये युजर्स अनन्याची चांगलीच परीक्षा घेत आहेत कि आर्यनने तिला दुर्लक्षित केले. तर कोणी कमेंट करत आहे कि आर्यनमध्ये खूपच अॅटीट्यूड आहे.

नुकतेच जेव्हा अनन्या, करण जौहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये आली होती तेव्हा तिने सांगितले होते कि तिच्या मैत्रिणीचा भाऊ आर्यनवर तिला क्रश आहे. तिने म्हंटले होते कि तो खूपच क्युट आहे आणि आर्यन माझा क्रश आहे.

अनन्याच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती लायगर चित्रपटामध्ये शेवटची दिसली होती. या चित्रपटामध्ये अनन्यासोबत विजय देवरकोंडा देखील मुख्य भूमिकेमध्ये होता. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही. आता अनन्या खो गए हम कहां आणि ड्रीम गर्ल चित्रपटामध्ये दिसणार आहे. खो गए हम कहां चित्रपटामध्ये ती सिद्धांत चतुर्वेदीसोबत तर ड्रीम गर्ल चित्रपटामध्ये ती आयुष्मान खुराना सोबत दिसणार आहे.

आर्यन बद्दल बोलायचे झाले तर तो देखील बॉलीवूडमध्ये आपले करियर बनवू इच्छितो. तथापि त्याला अभिनेता बनायचे नाही तर चित्रपट निर्मंता म्हणून आपले करियर करायचे आहे. आर्यन यासाठी पूर्ण तयारी करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)