बॉलीवूड चित्रपट आणि त्यात काम करणारे कलाकार हे दोन प्रकारचे असतात. त्यातील एक प्रकार म्हणजे चांगला व दुसरा वाईट. म्हणजेच एखादा चित्रपट इतका चांगला असतो की तो तूफान असतो तर काही चित्रपट निकृष्ट असतात बघावेसे वाटत सुद्धा नाही. हाच प्रकार बॉलिवूड कलाकारांच्या वरती देखील असतो. चित्रपटात काम करणारे कलाकार अभिनय किती दमदार तिने करतात हे त्यांचे प्रेक्षक व काही अवॉर्ड शो ठरवतात. तुम्हीसुद्धा अनेक वर्ष बघितले असतील आणि बर्‍याचदा तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की हे लोक बेस्ट ऍक्टर किंवा एक्ट्रेस कशा प्रकारे देत असतील. यावर साठीचा क्रायटेरिया कशाप्रकारे ठरवला जात असेल. या सर्व प्रकाराच्या पाठी काही कटू सत्य सुद्धा आहे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

खोटे हावभाव :-
कोणता यावर्षी हा किमान चार ते पाच तासांचा असतो. त्यामुळे कोणताही मोठा दिग्गज कलाकार इतका वेळ ह्या अवार्ड शो साठी थांबून राहत नाही. हे कलाकार फक्त कोणताही अवॉर्ड स्वीकारायचा असेल किंवा त्यांच्या हस्ते कोणाला द्यायचा असेल तेवढ्या वेळे पुरतेच त्या शोमध्ये जातात. त्या मर्यादित वेळेत ते हसतात किंवा त्या शोमधील काही मुमेंट एन्जॉय करतात. तेवढ्यावरच व्हिडिओ ग्राफरला वेळ मारून न्यायची असते आणि व्हिडिओ एडिट करायचा असतो. यामुळेच अवॉर्ड शो बघताना आपल्याला टीव्हीवर सारखे सारखे तेच हसण्याचे सीन किंवा काही कलाकारांची सारखी दृश्ये दिसतात.
परफॉर्मन्स आणि भावताव :- एका इंटरव्ह्यू दरम्यान अक्षय कुमार ने सांगितले होते कि बऱ्याचशा अवॉर्ड फंक्शनमध्ये आयोजक कलाकारांना ऑफर देतात की आम्ही तुम्हालाच अवॉर्ड देऊ पण त्याबदल्यात तुम्ही तुमची स्टेज परफॉर्मन्स ची फी कमी करा. अक्षय कुमार ला सुद्धा अशी विचारणा झाली होती, त्यावेळी त्याने आयोजकांना सांगितले की एक वेळ तुम्ही मला अवॉर्ड देऊ नका पण माझं पेमेंट मला पूर्ण द्या. ह्यामुळेच हल्ली मोठे सितारे अवॉर्ड फंक्शन चा हिस्सा बनताना दिसत नाहीत.
नियंत्रण प्रक्रिया :- जेव्हा आयोजकांनी द्वारे अवॉर्ड नोमिनेशन ची फायनल लिस्ट तयार होत असते. त्यावेळी आयोजक कलाकारांच्या मॅनेजरशी संपर्क साधतात व कलाकार अवॉर्ड फंक्शन च्या दिवशी बिझी आहेत का ? त्यांचे शुट बाहेरगावी आहे का ? याची माहिती मिळवतात. यानंतर जर त्या कलाकारास अवॉर्ड मिळणार असेल तरच तो कलाकार या अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी होतो.

ऋषी कपूर यांनी पहिला अवॉर्ड खरेदी केला होता :-
एका मुलाखतीदरम्यान ऋषी कपूर यांनी स्वतः कबूल केले होते की त्यांच्या प्रथम पदार्पण असलेल्या बॉबी या चित्रपटासाठी बेस्ट डेब्यु ॲक्टर चा अवॉर्ड त्यांनी पैसे देऊन खरेदी केला होता.

बहिष्कार :-
अवॉर्ड फंक्शन मध्ये चालणाऱ्या अशा चुकीच्या गोष्टी मुळे अभिनेता अमीर खान व सनी देओल यांनी असे फंक्शन अटेंड करणं बंद केले आहे. आता याच फळीत कंगना राणावत, नवाजुद्दीन सिद्दिकी, जॉन अब्राहम, आणि अजय देवगन हे कलाकार देखील सहभागी होणार आहे.चांगल्या परफॉर्मन्स कडे दुर्लक्ष :- काहीवेळेस मोठे कलाकार शोमध्ये येण्यासाठी किंवा त्यांना अवॉर्ड देण्याच्या चक्कर मध्ये आयोजक चांगले परफॉर्मन्स देणाऱ्या कलाकारांकडे दुर्लक्ष करतात. निव्वळ मोठे कलाकार त्यांच्या शोमध्ये यावेत यासाठी ते इतर कलाकारांना नॉमिनेट देखील करत नाहीत. 2015 मध्ये बेस्ट ऍक्टर या कॅटेगरीमध्ये बेबी चित्रपटासाठी अक्षय कुमार, मांझी चित्रपटासाठी नवाजुद्दीन सिद्दिकी आणि दृश्यम चित्रपटासाठी अजय देवगन या कलाकारांचे नॉमिनेशन मध्ये सुद्धा नाव टाकले नव्हते आणि सर्वात महत्वाची हैराण करणारी गोष्ट होते की त्या अवॉर्ड फंक्शन मध्ये बेस्ट एक्टर चा अवार्ड शाहरुख खानच्या दिलवाले या चित्रपटातील भूमिकेला मिळाला होता. हा चित्रपट इतर चित्रपटांच्या तुलनेत तितकासा खास नव्हता.

नॉमिनेशन नसून देखील अवॉर्ड :- काही वेळेस मोठ्या कलाकारांना अवॉर्ड फंक्शनमध्ये बोलावण्यासाठी त्या कलाकारास नॉमिनेशन नसून देखील एका स्पेशल कॅटेगिरी चे अवॉर्ड दिले जाते. केवळ त्या कलाकारांना वाईट वाटू नये वते कलाकार फंक्शनमध्ये येण्यासाठी स्टार ऑफ द इयर, इंटरटेनर ऑफ द इयर, किंवा मोस्ट स्पेशल परफॉर्मन्स ऑफ द इयर यांसारखे आवड तयार करून व त्या कलाकारांना दिले जातात.

नखरे :-
काही वर्षांपूर्वी अशाच एका अवॉर्ड शो मध्ये एका अभिनेत्रीने जिथे अवॉर्ड शो होणार होता त्या बिल्डिंगच्या बाहेर तिची गाडी पार्क केली व आयोजकांना फोन करून सांगितले की जर मला अवॉर्ड मिळणार असेल तरच मी आत येणार नाहीतर येणार नाही त्या अभिनेत्रीचे नाव अजूनही समजलेली नाही.मी फक्त हाच अवॉर्ड देणार :- कलाकारांचे फक्त अवॉर्ड घेण्या वरूनच नाही तर देण्यावरून सुद्धा नखरे असतात. अभिनेत्री रेखा ही फक्त बेस्ट एक्टर किंवा एक्ट्रेस चा अवॉर्ड देण्याचा हट्ट धरते. असेच काही वर्षांपूर्वी श्रीदेवीने सुद्धा पारितोषिक देण्यासाठी स्टेजवर येण्यास मनाई केली होती आणि या मागचे कारण होते की जगात तिचे करिअर संपुष्टात आले आहे अशा व्यक्तीला तिला जीवन गौरव पुरस्कार द्यायचा नव्हता तर त्याबद्दली तिला कोणत्याही नामांकित व्यक्तीस तिच्या हस्ते बक्षीस द्यायचे होते.