अक्षय कुमार आणि आमिर खान सोबत काम करणारी अभिनेत्री आयशा जुल्का आता आपला कंस्ट्रक्शरनचा बिजनेस आणि स्पा चा बिजनेस चालवते. ती एके काळी तरुणांच्या मनावर राज्य करत होती. तिने आपल्या करियरमध्ये अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर अचानक कॅमेऱ्याच्या या जगातून काढता पाय घेतला होता. ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीने अचानक आपल्या लग्नाची बातमी देऊन अनेक लोकांचे हृदय तोडले होते.१९८३ मध्ये सुरु केले होते करियर :- आयशा जुल्काने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात १९८३ मध्ये कैसे-कैसे लोग चित्रपटामधून केली होती. या चित्रपटाने तिला बॉलीवूडमध्ये ओळख निर्माण करून दिली होती. आयशाने १९९१ मध्ये आपला पहिला हिट चित्रपट दिला होता. ती एका पाठोपाठ एक हिट चित्रपट देत गेली आणि दिग्दर्शकांची पहिली पसंत बनत गेली. १९९२ मध्ये तिने आमिर खानसोबत काम केले. या चित्रपटामुळे ती खूपच लोकप्रिय झाली होती. याच वर्षी तिचा खिलाडी चित्रपट सुपरहिट झाला होता ज्यामध्ये तिने अक्षय कुमार सोबत काम केले होते.सुपरस्टार्स सोबत केले काम :- आयशा जुल्काने अक्षय कुमार, आमिर खान, सलमान खान, अजय देवगन, गोविंदा ई. मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केले. तिने आपल्या करियरमध्ये ५२ चित्रपट केले, ज्यामधील अनेक चित्रपट सुपरहिट झाले. तिने फक्त बॉलीवूडमध्ये नाही तर ओडिया, कन्नड आणि तेलगु चित्रपटामध्ये देखील काम केले.
गुपचूप केले लग्न :- २००६ पर्यंत सतत काम केल्यानंतर ती अचानक बॉलीवूड इंडस्ट्रीमधून गायब झाली. २००३ मध्ये तिने बिजनेसमॅन समीर वाशीसोबत गुपचूप लग्न केले आणि काही काळानंतर बॉलीवूड इंडस्ट्री सोडून पतीसोबत मिळून बिजनेस सांभाळू लागली.करोडोंची आहे मालकीण :- आज आयशा करोडोच्या प्रॉपर्टीची मालकीण आहे. सध्या ती एक मोठी कंस्ट्रक्शन कंपनी सांभाळते, ज्याचे नाव सैमरॉक डेव्हलपर्स आहे. हि कंपनी तिने आपला पती समीर वाशी सोबत मिळून सुरु केली होती. या कंपनी शिवाय आयशाचा स्पाचा देखील बिजनेस आहे, ज्याने नाव अनंता आहे. त्याचबरोबर अॉडिशन्स नावाने तिचा कपड्यांचा ब्रँड देखील आहे. ती एक उत्कृष्ठ डिझाइनर देखील आहे. याशिवाय आयशाचा गोवामध्ये एक बुटीक रिसॉर्ट आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.