भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी यश मिळवल्यानंतर लग्न केले आहेत. लग्न केल्यानंतर अनेक लोकांचे करियर संपुष्टात आले आहे. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगले यश मिळवून देखील अद्यापही लग्न केलेले नाही.

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिचे नाव अनुष्का शेट्टी आहे. अनुष्का शेट्टी आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये नामी अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिने आपल्या करियरची सुरवात २००५ मध्ये सुपर या चित्रपटामधून केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिस बऱ्यापैकी यशस्वी झाला होता. या चित्रपटानंतर तिने महानदी चित्रपटामध्ये काम केले जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिने चांगले यश मिळवले आणि आज ती साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या बाहुबली चित्रपटामधून तिला सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली. अनुष्काने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक चित्रपट सुपरहिट केले आहेत.

अनुष्काने आतापर्यंत जवळजवळ ४४ चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि ती एका चित्रपटामध्ये काम करण्यासाठी ५ करोड रुपये फीस घेते. याच कारणामुळे ती खूपच श्रीमंत आहे. अनुष्का शेट्टीजवळ टोयोटा कोरोला अल्टीस, ऑडी क्यू ५ आणि बीएमडब्ल्यू ६ अशा एकूण ४ लक्झरी कार आहेत.अनुष्काने एक घर देखील खरेदी केले आहे ज्याची किंम्मत १२ करोड रुपये इतकी आहे. एका न्यूज वेबसाईटनुसार अनुष्का शेट्टी १४२ करोड रुपयांची मालकीण आहे. अनुष्का सध्या ३८ वर्षांची झाली आहे आणि अद्यापही ती अविवाहित आहे.