सब टीव्ही वरील प्रसिद्ध सिरीयल तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये बापुजीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणारे अभिनेता अमित भट्ट यांचे अनेक चाहते आहेत. सिरीयल मधील त्यांच्या अभिनयाचे खूपच कौतुक होत असते. सिरीयलमध्ये अमित भट्ट चंपकलाल जयंतीलाल गड़ाची भूमिका साकारत आहेत. या भूमिकेसाठी दर्शकांचे त्यांना भरभरून प्रेम मिळाले आहेत. लोक त्यांना प्रेमाने चंपक चाचा म्हणतात. पण तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि सिरीयलमध्ये वृद्ध दिसणारे अमित भट्ट खऱ्या आयुष्यामध्ये खूपच तरुण आहेत.अमित भट्ट हे खऱ्या आयुष्यामध्ये विवाहित आहेत त्यांची पत्नी खूपच सुंदर आहे. त्यांच्या पत्नीचे नाव कृती भट्ट आहे. त्यांचा जन्म १९ ऑगस्ट १९७२ रोजी गुजरात मध्ये झाला होता. सध्या ते मुंबई मध्ये राहत असून त्यांना दोन जुळी मुले आहेत. सिरीयलमध्ये वृद्धाची भूमिका साकारणारे अमित खऱ्या आयुष्यामध्ये फक्त ४७ वर्षांचे आहेत. हे जाणून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल पण हे अगदी खरे आहे.
अमित भट्ट यांची पत्नी दिसायला खूपच सुंदर आहे. या दोघांची जोडी खूपच सुंदर दिसते. तसे तर अमित यांची पत्नी कृती भट्ट हि इंडस्ट्रीच्या झगमगाटापासून दूरच असते. सध्या लॉकडाउन असल्यामुळे तारक मेहता का उल्टा चश्मा सिरीयलचे शुटींग खूप दिवसांपासून बंद आहे. शुटींग सुरु झाल्यानंतर पुन्हा आपल्याला अमित भट्ट यांच्या अभिनयाची झलक पाहायला मिळणार आहे.
सध्या दर्शकसुद्धा याची आतुरतेने वाट पाहत आहेत कि तारक मेहता का उल्टा चश्मा सिरीयल पुन्हा कधी सुरु होईल कारण हि सिरीयल दर्शक खूपच पसंत करतात. हि सिरीयल पाहिल्यानंतर दर्शक आपले दुख विसरून जातात आणि हसू लागतात. सिरीयलमध्ये चंपक चाचाला देखील दर्शक खूप पसंत करतात, जे आपल्या उत्कृष्ठ अभिनयाने सर्वांची मने जिंकतात.