२०१५ मध्ये प्रदर्शित झालेला सलमान खानचा बजरंगी भाईजान हा चित्रपट बॉलीवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट झाला होता. ज्यामध्ये जितकी लोकप्रियता सलमान खानला मिळाली तितकीच लोकप्रियता मुन्नीची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकार हर्षाली मल्होत्राला देखील मिळाली. प्रेक्षकांना मुन्नीची भूमिका खूपच आवडली होती.

बजरंगी भाईजान चित्रपटाला ५ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि या ५ वर्षांमध्ये मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा खूपच बदलली आहे. बजरंगी भाईजानमधील मुन्नी आता ११ वर्षांची झाली आहे आणि खूपच स्टाइलिश दिसत आहे.मुन्नीच्या बाबतीत तर आपणाला सर्व काही माहिती आहे परंतु आज आम्ही तुम्हाला तिच्या आईशी ओळख करून देणार आहोत जिच्याबद्दल खूप कमी लोकांना माहित आहे. एका माहितीनुसार मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्राच्या आईचे नाव काजल मल्होत्रा असे आहे. मुन्नी इतकी क्युट याचमुळे आहे कारण तिची आई काजल मल्होत्रा बॉलीवूडच्या एखाद्या अभिनेत्रीपेक्षा काही कमी सुंदर नाही. काजल एक भारतीय चित्रपट निर्माता आहे. जिने प्रामुख्याने बॉलिवूडमध्ये काम केले आहे.सध्या काजल आपल्या कुटुंबासोबत वेगळ घालवत आहे. तिच्या पतीचे नाव विपिन मल्होत्रा असून ते एक बिजनेसमैन आहेत. काजल मल्होत्रा सोशल मिडियावर नेहमी सक्रीय असते आणि आपले आणि हर्षालीचे फोटो शेयर करत राहते.