आवाजासोबत या ९ गायिका दिसतात तितक्याच सुंदर, नंबर ४ आणि ६ ला पाहून तर दंग व्हाल !

3 Min Read

बॉलीवूड चित्रपट गाण्यांशिवाय अधुरे वाटतात. जोपर्यंत चित्रपटांमध्ये गाणी ऐकू येत नाही तोपर्यंत त्या चित्रपटांची मजा येत नाही. भारतातीय लोक संगीतासाठी रसिक आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही महिला गायिकांमध्ये सांगणार आहोत ज्या त्यांच्या सुंदर आवाजा प्रमाणेच त्यांच्या सुंदरतेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर जेव्हा त्या फोटो टाकतात. तेव्हा प्रेक्षकांकडून नेहमीच त्यांच्या सुंदरतेची प्रशंसा होत असते.

१) श्रेया घोषाल – श्रेया ही सर्वत्र प्रसिद्ध आणि उत्कृष्ट मराठी बोलणारी गायिका आहे. हिंदी चित्रपट श्रुष्टिवरती आपली छाप खूप दिवसांपासून राखून आहे. मराठी मधील सैराट तसेच आशिकी २ चित्रपटातील प्रेम गीतांना श्रेयाने आवाज दिला आहे.
२) आदिती सिंह शर्मा – देव डी या चित्रपटा मार्फत संगीत क्षेत्रात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याव्यतिरिक्त नो वन किल्ड जेसिका, टू स्टेट्स, धूम ३ यासारख्या चित्रपटांमध्ये तिने तिच्या आवाजाचा जलवा दाखवला आहे. चित्रपटांसोबतच अतिथी वेगवेगळ्या लव कॉन्सर्टमध्ये सुद्धा गात असते. आदिती चा आवाज व सौंदर्य या दोन्ही मनमोहक आहेत.
३) अनुष्का मनचंदा – डान्स बसंती, मनमा इमोशनल जागे, गो गो गोलमाल, लकी तू लकी मी यांसारख्या गाण्यांमुळे प्रसिद्ध झालेली अनुष्का खूप हॉट अँड बोल्ड आहे.तिचा ड्रेसिंग सेन्स पण खूप चांगला असून सोशल मीडियावरील तिच्या फोटोस् ना खूप साऱ्या लाईक्स मिळत असतात.
४) श्वेता पंडित – श्वेताने बॉलिवूडमधील ए आर रहमान सारख्या अनेक नामांकित संगीतकारांसोबत काम केले आहे. श्वेताने बॉलीवूडला अनेक हिट आणि प्रसिद्ध गाणी दिली. एक भारतीय शास्त्रीय गायक आणि पद्म विभूषण पुरस्कार विजेते पंडित जसराज यांची नात आहे.
५) नेहा कक्कड – बॉलीवूड चे सध्याची सर्वात प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड आहे. नेहा इंडियन आयडॉल सीझन २ ची कंटेस्टंट होती आणि आता ती इंडियन आयडॉल सीजन ११ ची परीक्षक आहे. इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकल्यापासून नेहाच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. सध्याच्या काळात महिलांमध्ये सर्वात प्रसिद्ध गायिका म्हणून नेहाला ओळखले जाते.
६) मोनाली ठाकुर – मोह मोह के धागे, टच में ख्वाब देखे यांसाठी अनेक प्रसिद्ध गाणे मोनाली ने गायली आहेत. तिच्या आवाजा प्रमाणेच ती देखील सुंदर आहे. तिच्या सुंदरते मुळेच तिला लक्ष्मी नावाच्या एका चित्रपटात प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती.
७) नेहा भासिन – नेहाच जितकी चांगली गायिका आहे तितकीच ती चांगली लेखिका सुद्धा आहे. ती गाणी गाण्यासोबतच अनेक गाण्यांचे लेखन सुद्धा करते. नेहा फारच स्टायलिश आहे. उस्ताद घुलाम मुस्तफा यांच्याकडून नेहाने गाण्याचे शिक्षण घेतले होते.
८) शाल्मली खोलगडे – इशकजादे या चित्रपटात गाणे गाऊन शाल्मलीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील डीजे गाणे इतके प्रसिद्ध झाले की त्यासाठी तिला एका पुरस्काराने सन्मानित सुद्धा केले गेले. शाल्मली जितकी चांगली गायिका आहे तितकीच ती सुंदर देखील दिसते.
९) नीती मोहन – इश्क वाला लव, जिया रे यांसारखी अनेक प्रसिद्ध गाणी नीतीने बॉलिवूडला दिली. तिच्या आवाजामुळे तिने अनेक पुरस्कारांवर तिचे नाव कोरले आहे. तिचा लुक सुद्धा कमालीचा सुंदर आहे. त्याचप्रमाणे तिचा फॅशन सेन्स सुद्धा फार उत्कृष्ट आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *