आज आम्ही तुम्हाला या लेखात असे काही क्रिकेटर बद्दल सांगणार आहोत, ज्यांचे नशीब तर उज्वल आहेच त्याचबरोबर त्यांच्या पत्नी दिसायला देखील खुपचं सुंदर आहेत. आणि त्याच्या प्रेमाची सुरवात कशी झाली. फेब्रुवारी महिन्याचे सुरुवातीचे दोन आठवडे प्रेम करणाऱ्या लोकांसाठी खूपच खास असतात ज्याला व्हॅलेंटाईन म्हणतात. या दिवशी प्रेम करणारे आपले प्रेम व्यक्त करतात. पण आज तुम्हाला अशा क्रिकेटर्स बद्दल सांगणार आहोत ज्यांच्या लव्ह स्टोरीपासून तुम्ही शिकू शकता कि प्रेम कसे साकारले जाते.

महेंद्र सिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी :- भारताचा प्रसिद्ध यष्टीरक्षक फलंदाज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनीची जोडी क्रिकेट जगतामध्ये खूपच लोकप्रिय आहे. महेंद्र सिंह धोनीची भेट साक्षी सोबत त्यादरम्यान झाली होती जेव्हा धोनी भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या दौऱ्यासाठी बंगालच्या ताज हॉटेलमध्ये थांबला होता. त्याच्या पहिल्या भेटीदरम्यान त्यांची जवळीक वाढली आणि ज्यानंतर ४ जुलै २०१० रोजी धोनीने साक्षीसोबत लग्न केले आणि आज या दोघांना एक मुलगी देखील आहे.सौरभ गांगुली आणि डोना :- भारतीय क्रिकेट संघातील पूर्व खेळाडू आणि सध्याचा बीसीसीआईचा अध्यक्ष सौरव गांगुलीने लव्ह मॅरेज केले आहे. वास्तविक डोना सौरव गांगुलीच्या शेजारी राहत होती आणि या दोघांनी आपल्या कुटुंबियांना न सांगता गुपचूक लग्न केले होते.
सचिन तेंदुलकर आणि अंजलि :- भारतीय क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडूलकरला क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू मानले जाते. सचिन तेंडूलकरने आपली पत्नी अंजलीला पहिल्यांदा एयरपोर्टवर पाहिले होते आणि तेव्हाच तो तिच्या प्रेमामध्ये पडला होता. ज्यानंतर काही काळानंतर सचिनने अंजलीसोबत लग्न केले. अंजली सचिनपेक्षा १० वर्षाने मोठी आहे पण सचिन आणि तिच्या प्रेमामध्ये तिचे वय कधीच आले नाही.
शिखर धवन आणि आयशा मुखर्जी :- भारतीय क्रिकेट संघाचा उत्कृष्ठ सलामीवीर शिखर धवनने घटस्फोटीत दोन मुलांची आई आयशा मुखर्जी सोबत लग्न केले. शिखर धवन आणि आयशाची भेट फेसबुक द्वारे झाली होती. यानंतर शिखरला आयशासोबत प्रेम झाले आणि दोघांनी लग्न केले. त्याचबरोबर तिच्या दोन मुलांना देखील आपले केले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.