बॉलीवूड फिल्मी जगतामधील प्रसिद्ध अभिनेता गोविंदा प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. ९० च्या दशकामध्ये गोविंदाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. जे लोकांना खूपच पसंत आले होते. गोविंदाने आपल्या क्लासिक कॉमेडीने लोकांना खूप हसवले.आज आपण गोविंदाच्या मुलीबद्दल जाणून घेणार आहोत. जी दिसायला एखाद्या अप्सरेपेक्षा कमी नाही. चला तर जाणून घेऊया गोविंदाच्या मुलीबद्दल. गोविंदाच्या मुलीचे नाव टीना आहूजा आहे. टीनाचा जन्म १६ जुलै १९८९ रोजी महाराष्ट्राच्या मुंबई मध्ये झाला होता. टीनाने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले असून तिने लंडन फिल्म स्टुडिओमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे.
टीनाची बॉलीवूडमध्ये २०१५ मध्ये एंट्री झाली होती. तिचा पहिला डेब्यू चित्रपट सेकंड हैंड हसबँड होता. या चित्रपटासाठी तिला बेस्ट इमर्जिंग अॅक्ट्रेसचा अॅवॉर्ड मिळाला होता. यानंतर तिने २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या जिंदगी का रहस्य २ मध्ये काम केले होते. या चित्रपटामध्ये तिने पूजाची भूमिका केली होती.
टीनाने आतापर्यंत मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण अजूनही तिला बॉलीवूडमध्ये ते स्थान मिळवता आले नाही ज्याची ती हकदार आहे. सौंदर्यामध्ये टीना आहूजा कोणापेक्षा कमी नाही. टीना आहूजा सौंदर्यात एखाद्या अप्सरेपेक्षा कमी नाही. ती नेहमी सोशल मिडियावर आपले फोटो चाहत्यांसोबत शेयर करत असते. टीना आहूजाला फिटनेसमध्ये खूप रस आहे. ती नेहमी जिम बाहेर पाहायला मिळत असते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.