तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने होतात हे ७ फायदे ! भारतात प्राचीन काळापासून तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये पाणी साठवण्याची परंपरा चालत आलेली आहे. त्यामागे शास्त्रीय कारण आहे. ते म्हणजे तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी हे त्या धातूंच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे फक्त निर्जंतुकच होते असे नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात प्रविष्ट होतात. शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी हेच पाणी सकाळी अनशी पोटी व तांब्याच्या भांड्यात ठेवलेले प्यायल्यास त्याचा अधिक फायदा होतो. काळानुरूप जीवनशैलीत बदल झाले व पारंपारिक वस्तूंची जागा पाश्चात्य संस्कृतीने घेतली. मग पहा तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी का प्यावे ? आयुर्वेदीक महत्त्व – आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक (कफ, पित्त, वात) असते. त्यामुळे किमान 8 तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी निर्जंतुक होते व आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात सामाविष्ट होतात. तसेच कफाची समस्या असलेल्यांनी या पाण्यामध्ये तुळशीचे पान टाकावेत. हे लक्षात ठेवा, तांब्याच्या भाड्यात कमीतकमी आठ तास ठेवलेले पाणीच लाभकारी असते. ज्या लोकांना कफची समस्या जास्त प्रमाणात असेल त्यांनी या पाण्यामध्ये तुळशीचे पान टाकावेत. फार कमी लोकांना तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे महत्त्व माहिती असावे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास कोणकोणते लाभ होतात.

१) तांब्याच्या पिण्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. यामुळे शरीरातील तांब्याची कमतरता भरुन निघते. तसंच रोग पसरवणाऱ्या जिवाणूंपासून शरीर सुरक्षित ठेवतं.

२) तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी शुद्ध मानलं जातं. हे पाणी जुलाब, कावीळ, अतिसार यांसारखे अनेक आजार पसरवणाऱ्या जिवाणूंना नष्ट करतं.

३) तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे शरीराला वेदना, वात आणि सूज येत नाही. संधिवात असल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने फायदा होतो.

४) अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, कॅन्सरची सुरुवात रोखण्यास तांबे फायदेशीर आहे. यामध्ये कॅन्सरविरोधी घटक असतात.

५) पोटाच्या सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी तांब्याचं पाणी अतिशय उपयोगी असतं. दररोज हे पाणी प्यायल्यास पोटदुखी, गॅस,अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर आराम मिळतो.

६) तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने त्वचेवर कोणत्याही प्रकारची समस्या होत नाही. या पाण्यामुळे फोड्या, तारुण्यापीटिका तसंच त्वचेसंदर्भातील रोग होत नाहीत. तसंच त्वचा साफ आणि चमकदार होते.

७) शरीराच्या अंतर्गत सफाईसाठी तांब्याचं पाणी फायदेशीर आहे. याशिवाय हे पाणी यकृत आणि किडनी निरोगी ठेवतो. कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचावासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणं लाभदायक असतं.