दूरदर्शन टीव्ही चॅनलमुळे अनेक कलाकारांच्या करियरला गती मिळाली आहे. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने सुद्धा आपल्या करियरची सुरवात दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या एका टीव्ही सिरीयल मधूनच केली होती. ९० च्या दशकामध्ये टीव्हीवर अनेक फॅमिली ड्रामा सारख्या सिरीयल येत होत्या. त्यावेळी ज्या कलाकारांनी या सिरियल्स मध्ये भूमिका साकारल्या होत्या त्यांना आजसुद्धा आठवले जाते. त्या कलाकारांनी लोकांच्या मनामध्ये एक स्थान निर्माण केले होते. आज आम्ही अशाच काही कलाकारांबद्दल सांगणार आहोत.

शिखा स्वरूप – चंद्रकांता :- टीव्ही अभिनेत्री शिखा स्वरूपने चंद्रकांता सिरीयलमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. १९९८ मध्ये तिने मिस इंडियाचा किताब देखील आपल्या नावे केला होता. याशिवाय तिने २०१२ मध्ये प्रसारित झालेल्या रामायण सिरीयलमध्ये कैकयीची भूमिकासुद्धा साकारली होती. त्याकाळामध्ये तिचे खूपच चाहते होते.श्वेता कावत्रा – कहानी घर घर की :- २००० मध्ये सुरु झालेली टीव्ही सिरीयल कहानी घर घर की मध्ये श्वेताने पल्लवीची भूमिका साकारली होती. या टीव्ही सिरीयलला लोकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. श्वेताला सुद्धा या सिरीयलमधून चांगली ओळख मिळाली होती, पण आता ती मिडियापासून दूर राहणेच पसंत करते.मंदिरा बेदी – शांति :- अभिनेत्री मंदिरा बेदीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिला १९९४ मध्ये प्रसारित झालेल्या शांति या सिरीयलमधून मिळाली. या सिरीयलमध्ये तिचा कुरळ्या केसांचा लुक लोकांना खूपच आवडला होता. असे सुद्धा सांगितले होते कि लोकांनी तिच्यामुळेच आपल्या मुलींची नावे शांति ठेवायला सुरवात केली होती. सध्या ती आपल्या फिटनेसमुळे जास्त चर्चेमध्ये राहत असते.
रेणुका शहाणे – सुरभि :- अभिनेत्री रेणुका शहाणेला सुरभि या सिरीयल मधून खरी ओळख मिळाली. १९९० पासून २००१ पर्यंत चाललेल्या या सिरीयलला रेणुकाने होस्ट केले होते. तसे तर आजसुद्धा तिला खूपच पसंत केले जाते. याशिवाय ती चित्रपटांमध्ये सुद्धा काम करते. त्याचबरोबर ती तिच्या ट्विटबद्दलहि नेहमी चर्चेमध्ये राहत असते.