बिहारच्या एका शेतकऱ्याने कमाल केली आहे. या शेतकऱ्याला नेहमी काहीतरी वेगळे करण्याची आवड आहे. तो युट्युब पाहायचा. तिथूनच त्याने ब्लॅक पोटॅटो म्हणजेच काळा बटाटाची माहिती मिळाली. यानंतर त्याने अमेरिकेमधून ब्लॅक पोटॅटोचे बी मागवले. आता त्याने काळा बटाटा पिकवला देखील आहे. बिहारच्या गया येथील राहणारे आशिष सिंग या शेतकऱ्याने हा पुढाकार घेतला होता. त्याने अमेरिकेमधून ब्लॅक पोटॅटोचे बी मागवले आणि १४ किलो बियांची शेती केली.

आशीषने टिकारी प्रखंडच्या गुलरियाचक गावामध्ये ब्लॅक पोटॅटोचे बी लावले होते. १० नोव्हेंबर रोजी आशीषने बियांची पेरणी केली होती आणि १२० दिवसांनंतर १३ मार्चला पिकाचे हार्वेस्टिंग केले गेले. आशीषने पहिले उत्पादन १२० किलोचे केले. तथापि त्याला आशा होती कि २०० किलो बटाटा पिकेल. पण हवामानाचा फटका बसल्यामुळे उत्पादन थोडे कमी झाले.सामान्यतः ब्लॅक पोटॅटोची शेती अमेरिकेच्या पर्वतीय क्षेत्र एंडीजमध्ये होते. आता बिहारमध्ये देखील याची शेती केली जात आहे. आशीषचे अनुसरण करत इतर शेतकरी देखील काळ्या बटाट्याचे उत्पादन करण्याची योजना बनवत आहेत. इतर राज्यांमध्ये देखील याची मोठी डिमांड आहे.आशीषने जेव्हा बियाणे मागवले होते तेव्हा ते १५०० रुपये किलो होते. आशीषने जवळ जवळ एक कट्टा बियाणे पेरले होते. आता जे उत्पादन झाले आहे ते तो दुसऱ्या शेतकऱ्यांनाही विकत आहे. त्याने ३०० ते ५०० रुपये किलो दराने बी विकण्याचा निर्णय घेतला आहे.