बऱ्याचदा आपल्याला अशा संधी मिळतात ज्यामुळे आपले नशीब पूर्णपणे पालटून जाते. परंतु आपल्याद्वारे घेतलेला एक निर्णय आपल्या आयुष्यातील एक चूक सिद्ध होते आणि आपण ती संधी गमावून बसतो. अशी चूक आपण आयुष्यामध्ये अनेक वेळा करतो, कधी व्यक्ती संबंधित तर कधी करियर बद्दल तर अनेक गोष्टींबद्दल देखील. असो आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशाच काही स्टार्सविषयी सांगणार आहोत.

खरे तर बॉलीवूडचे असे काही स्टार्स आहेत ज्यांनी आपल्या करियरमधील काही असे चित्रपट नाकारले जे फिल्मी इतिहासामध्ये माइलस्टोन सिद्ध झाले. हे चित्रपट त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवू शकत होते परंतु त्यांनी चुकीचा निर्णय घेतला आणि चित्रपट नाकारले. आज सुद्धा अनेक असे स्टार्स आहेत ज्यांना आजसुद्धा आपल्या या निर्णयावर पश्चाताप होत आहे.

जूही चावला :- जुही चावला तिच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री राहिली आहे. नुकतेच तिने राजीव मसंदला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले कि करिश्माला जी काही प्रसिद्ध मिळाली आहे ती तिच्यामुळेच आहे. कारण राजा हिंदुस्तानी आणि दिल तो पागल है सारखे चित्रपट जुहीला ऑफर झाले होते. परंतु जुहीने त्याला नकार दिला नंतर करिश्माला घेतले गेले. राजा हिंदुस्तानी चित्रपटामधून तर करिश्मा रातोरात स्टार बनली होती. जुहीच्या या वक्तव्या वरून तर हाच अंदाज येतो कि तिला हे चित्रपट नाकारल्याबद्दल पश्चाताप होतो आहे.अजय देवगन :- १९९५ मध्ये आलेला सलमान आणि शाहरुखचा करन अर्जुन चित्रपट खूपच सुपरहिट राहिला होता. आजसुद्धा हा चित्रपट पाहण्यासाठी दर्शक पसंत करतात. या चित्रपटामध्ये अर्जुनची भूमिका पहिला अजयला ऑफर झाली होती. पण अजयने यासाठी नकार दिला त्यानंतर या भूमिकेसाठी शाहरुखची निवड करण्यात आली.
विकास भल्ला :- १९८९ मध्ये आलेला सुरज बड़जात्या दिग्दर्शित मैंने प्यार में किया चित्रपटामध्ये सलमान खान दिसला होता. हा चित्रपट सुपरहिट राहिला होता या चित्रपटामुळे सलमान खान सुपरस्टार बनला. या चित्रपटासाठी सुरज बड़जात्याची पहिली पसंत सलमान नव्हता तर विकास भल्ला होता. पण त्यावेळी काही कारणास्तव विकासने हा चित्रपट नाकारला आणि नंतर हि भूमिका सलमानला मिळाली. सध्या विकास भल्ला टीव्ही सिरियल्समध्ये पाहायला मिळतो.करीना कपूर :- १९९९ मध्ये आलेला हम दिल दे चुके सनम या चित्रपटामध्ये सलमान आणि ऐश्वर्या एकत्र पाहायला मिळाले होते. या चित्रपटामधील ऐश्वर्याची भूमिका संजय लीला भन्साळीने पहिला करीनाला ऑफर केली होती पण तिने नकार दिला.सैफ अली खान :- अजूनही प्रशंसेचा पात्र असलेला चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे पहिला सैफ अली खानला ऑफर झाला होता. पण त्याने हे सांगून हा चित्रपट नाकारला कि, तो लव्हर बॉय नाही बनणार. या चित्रपटासाठी आदित्य चोप्राने सैफला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने साफ नका दिला. शेवटी हा चित्रपट शाहरुखला मिळाला.