बॉलीवूड फिल्मी जगतामधील हिमॅन अभिनेता धर्मेद्रचा मुलगा अभिनेता बॉबी देओल नुकतेच अक्षय कुमार सोबत हाउसफुल ४ चित्रपटामध्ये काम करताना पाहायला मिळाला आहे. बॉबी देओलने बॉलीवूडमध्ये कमीच हिट चित्रपट दिले आहेत पण तरीही बॉबी देओलच्या लोकप्रियतेमध्ये जराही कमी झालेली नाही आज सुद्धा तो दर्शकांच्या मनावर राज्य करतो. अनेक मुली बॉबी देओलच्या दिवाण्या होत्या पण एके काळी बॉबी देओल कोणाच्या तरी प्रेमामध्ये दिवाना होता.

आज आम्ही बॉबी देओलच्या जीवनाशी संबंधी एक रहस्य सांगणार आहोत जे जाणून तुम्ही देखील चकित व्हाल. बॉबी देओल आज आपल्या कुटुंबासोबत खूप आनंदी आहे पण त्याच्या आयुष्यामध्ये एक अशी मुलगी सुद्धा होती जिच्यावर तो खूप प्रेम करत होता. ती मुलगी कोणतीहि साधारण मुलगी नव्हती तर ९० च्या दशकातील एक सफल अभिनेत्री होती. आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिचे नाव नीलम कोठारी आहे.बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाणारी अभिनेत्री नीलम कोठारी बॉबी देओलवर खूप प्रेम करत होती, नीलमचा जन्म ९ नोव्हेंबर १९६९ रोजी झाला होता. ९० च्या दशकामध्ये बॉबी देओल आणि नीलम कोठारी एकमेकांना खूप पसंत करत होते. दोघांची एकत्र आयुष्य घालवण्याची इच्छा होती पण एका व्यक्तीमुळे त्यांची लव्ह स्टोरी संपुष्टात आली.नीलम आणि बॉबी यांचे लग्न न होण्याचे कारण धर्मेद्र आहेत. त्यांची इच्छा नव्हती कि बॉबीने अशा मुलीवर प्रेम करावे जी चित्रपटांमध्ये काम करते. यामुळे बॉबी आणि नीलमला वेगळे व्हावे लागले. स्टारडस्ट मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये नीलमने सांगितले आहे कि बॉबीसोबत ब्रेकअप नंतर तिची प्रकृती खूपच खराब होती आणि ती डिप्रेशनमध्ये गेली होती.
९० च्या दशकातील अभिनेत्री नीलमने अनेक बॉलीवूडच्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. दूध का कर्ज तिचा सुपरहिट चित्रपट मानला जातो. बॉबी देओल आणि नीलमचे नाते सर्वांसमोर होते पण धर्मेंद्र या नात्याच्या विरुद्ध होते. धर्मेंद्रची इच्छा होती कि बॉबी देओलने अरेंज मॅरेज करावे, ज्यानंतर बॉबी देओल आणि नीलम एकमेकांपासून वेगळे झाले.