हे बॉलीवूड अभिनेते त्‍यांच्‍या पत्‍नींना ठेवतात राणी सारखे, नंबर ३ आणि ५ ला पाहून तर दंग व्हाल !

3 Min Read

घरातील महिलेशिवाय ते घर सुनेसुने वाटते. एका संपूर्ण घराला सांभाळायला व ते सजवायला एका स्त्रीची भूमिका महत्त्वाची असते. स्त्रिया घराचे स्वर्ग म्हणतात त्यामुळे स्त्रियांचा आदर राखणे महत्त्वाचे असते. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये देखील असे काही अभिनेते आहेत जे स्त्रियांचा भरपूर सन्मान करतात. तसेच स्वतःच्या पत्नीला एखाद्या राणी सारखे नांदवतात. त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात.

१) शाहरुख खान :- १९९१ मध्ये शाहरुखने गौरी सोबत लग्न केले. लग्नानंतर त्याने बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. शाहरुख व गौरी ची प्रेम कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल अशीच आहे. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर देखील शाहरुख त्याच्या पत्नीवर म्हणजेच गौरी वर अजूनही भरपूर प्रेम करतो.शाहरुख त्याच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यात गौरीला एखाद्या राणीसारखी ठेवतो. शाहरुखकडे अंदाजे ७५० मिलियन डॉलरची संपत्ती आहे. म्हणजेच भारतीय चलनामध्ये ५३५८ करोड़ रुपये इतकी आहे.
२) अमिताभ बच्चन :- अमिताभ बच्चन व जया बच्चन यांची प्रेमकहाणी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. यांच्या लग्नाला ४६ वर्षे पूर्ण झाली परंतु या दोघांमधील प्रेम अजून तिळमात्र देखील कमी झालेले नाही. दोघे एकमेकांसोबत भरपूर खूश आहेत. अमिताभ देखील जया यांना खुश ठेवण्यासाठी कोणतीही कसर मागे सोडत नाही. अमिताभ बच्चन कपडे सध्या २८५३ करोड़ रुपये इतकी संपत्ती आहे.
३) अक्षय कुमार :- अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना ला बॉलिवूडमधील बेस्ट कपल मानले जाते. या दोघांच्या लग्नाला १८ वर्षे पूर्ण झाली. परंतु आज देखील या दोघांमधील केमिस्ट्री तितकेच घट्ट आहे. अक्षयकुमार कडे सध्या १०६९ करोड़ रुपये इतकी संपत्ती आहे.
४) अजय देवगण :- अजय देवगन ची पत्नी काजल ही बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री आहे. अजय देवगन व काजोलच्या लग्नाला २१ वर्षे पूर्ण झाली तरीही हे दोघे एकमेकांची भरपूर काळजी घेतात व एकमेकांवर भरपूर प्रेम करतात. अजय देवगन कडे २१३ करोड रुपयांची संपत्ती आहे.
५) सुनील शेट्टी :- सुनीलने २८ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९१ मध्ये माना सोबत लग्न केले. माना ज्यावेळी पहिल्यांदा सुनील यांना भेटल्या तेव्हा त्या अवघ्या १७ वर्षांच्या होत्या. त्यानंतर नऊ वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केले आणि मग लग्न केले. ही जोडी आज देखील एकमेकांसोबत सुखी जीवन जगत आहेत. सुनील शेट्टी ची संपत्ती ७१ करोड रुपये इतकी आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *