या फेमस कलाकारांच्या शारीरिक-मानसिक समस्यांबद्दल क्वचितच तुम्हाला माहिती असेल, नंबर ३ आहे खूपच चकित करणारा !

4 Min Read

बॉलीवूड फिल्मी जगतामध्ये अनेक मोठ-मोठे कलाकर आहेत ज्यांच्या अभिनयाचे आणि लुक्सचे लाखो लोक दिवाने आहेत. पण आज आम्ही तुम्हाला ५ अशा कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या शारीरिक कमीवर कधी कॅमेऱ्याची नजर पडली नाही. तसे पाहिले तर सध्याच्या युगामध्ये कॅमेरा इतका अॅरडव्हांस झाला आहे कि कोणत्याही कलाकारची कोणतीही कमी दिसत नाही. आज आम्ही तुम्हाला सुपरस्टार्सच्या काही अशाच शारीरिक कमीबद्दल सांगणार आहोत ज्याच्याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे.

ऋतिक रोशन :- बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील हँडसम अभिनेता ऋतिक रोशनच्या हाताला दोन अंगठे आहेत आणि तो त्याला खूपच लकी मानतो. पण त्याने कॅमेर्यानसमोर आपली हि कमी कधीच येऊ दिली नाही. त्याचबरोबर ऋतिकला लहानपणापासूनच बोलण्यात अडचण येते आणि त्याला अडखळत बोलण्याची समस्या होती. हि समस्या दूर करण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. तासनतास स्पीच थेरेपी सेशन अटेंड करणे. सराव करणे इतके सोपे नाही, पण वर्षानुवर्षे कठोर परिश्रम आणि त्याच्या निश्चयामुळे या समस्येने त्याच्यासमोर गुडघे टेकले. आज तो बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे.इलियाना डिक्रूज :- साउथ आणि बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील फेमस अभिनेत्री इलियाना डिक्रूज खूपच सुंदर अभिनेत्री आहे. पण तिने जेव्हा बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते तेव्हा तिच्या कंबरेमध्ये एक समस्या होती पण तिने या समस्येबद्दल कोणालाही सांगितले नाही. माहितीनुसार इलियानाने सर्जरी करून या समस्येपासून सुटका मिळवली होती.
अर्जुन कपूर :- बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी खूपच लठ्ठ होता आणि पण त्याने आपला लठ्ठपणा कमी केला पण लठ्ठपणा कमी झाल्यानंतर त्याचे पाय वाकडे झाले पण त्याने हि गोष्ट कॅमेऱ्यासमोर कधीच येऊ दिली नाही. यामुळे अर्जुन कपूर नेहमी सैल कपडे घालतो.सुधा चंद्रन :- प्रसिद्ध अभिनेत्री आणि क्लासिकल डांसर सुधा चंद्रनला कोण नाही ओळखत. टीव्हीवरील प्रसिद्ध सिरीयल कहीं किसी रोज़ मध्ये रमोलाची निगेटिव भूमिका असो किंवा नागिन मध्ये विलेनची भूमिका असो सुद्धाने प्रत्येक भूमिका उत्कृष्ठरित्या साकारली. भारतीय टेलीव्हिजन इंडस्ट्री असो किंवा फिल्म इंडस्ट्री असो सुद्धाने अनेक अॅोवॉर्ड जिंकले आहेत. तुम्हाला जाणून हैराणी होईल कि या प्रसिद्ध क्लासिकल डांसरचा १६ व्या वर्षी अपघात झाला होता आणि अपघातामध्ये तिने आपला एक पाय गमावला होता. पण तिने हार मानली नाही आणि जयपुर फुट लावून तिने क्लासिकल डांसची ट्रेनिंग पूर्ण केली. नक्कीच ती प्रत्येकासाठी एक प्रेरणा आहे.राणा दग्गुबाती :- बाहुबली चित्रपटामधून घराघरामध्ये प्रसिद्धी मिळवणारा भल्लालदेव म्हणजे राणा दग्गुबाती तेलुगु चित्रपटातील सुपरस्टार आहे. साउथमध्ये त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. बाहुबलीनंतर पूर्ण देशामध्ये सेंसेशन बनलेल्या रानाबद्द्ल एक गोष्ट खूपच चकित करणारी आहे. नुकतेच त्याने एका व्हिडिओमध्ये सांगितले होते कि त्याला एका डोळ्याने दिसत नाही. एका डोळ्याने दिसत नसले तरी त्याने आपली हि कमी कधीच उघड होऊ दिली नाही. त्याचा अभिनय पाहून कोणीही म्हणू शकत नाही कि त्याला एका डोळ्याने दिसत नाही. आपल्या या कमीला त्याने कधीच आपल्या अभिनयाच्या आडवे येऊ दिले नाही.अभिषेक बच्चन :- जूनियर बच्चनचे लाखो करोडो चाहते आहेत. अभिषेक बच्चनने जेव्हा पासून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले तेव्हापासून अनेक मुली त्याच्या दिवाण्या आहेत. खूपच कमी चित्रपट करून देखील अभिषेक सर्वांचा चाहता आहे. अभिषेकला पाहिल्यानंतर कोणीही म्हणू शकत नाही कि लहानपणी त्याने खूप काही सहन केले आहे. वास्तविक अभिषेकला डिस्लेक्सिया आजार होता, ज्याबद्दल आपण तारे जमीन पर या चित्रपटामध्ये पाहिले आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले. आज तो बॉलीवूडमधील स्टार आहे आणि त्याच्या कॉमिक टाईमिंगचे लोक कौतुक करतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *