बॉलीवूड कलाकारांच्या या व्हॅनिटी व्हॅन एखाद्या अलिशान घरापेक्षा काही कमी नाहीत, पहा फोटोज !

3 Min Read

आपण नेहमी विचार करतो कि बॉलीवूड कलाकार किती अलिशान जीवन जगतात पण आपण हा विचार करत नाही कि अशा जीवनामागे त्यांनी किती मेहनत घेतलेली असते. बॉलीवूड कलाकारांना घरापासून दूर राहून तासानतास शुटींग करावे लागते. एखाद्या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान त्यांना आराम करण्यासाठी काही मिनिटांचाच वेळ मिळतो. चित्रपटाच्या सेटमध्ये आराम करण्याची मनपसंद जागा असून देखील अनेक बॉलीवूड कलाकार आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आराम करने पसंत करतात. चला तर जाणून घेऊया बॉलीवूड जगतामधील कलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅनबद्दल आणि जाणून घेऊया त्यामध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत.

शाहरुख खान :- बॉलीवूड कलाकारांमध्ये शाहरुख खान आपल्या उत्कृष्ठ अभिनयाने ओळखला जातो. अनेक हिट चित्रपट देणाऱ्या शाहरुख खानला लक्झरी कारची खूप आवड आहे. शाहरुखने हुंडई क्रेटा फेसलिफ्ट लॉन्च झाल्याझाल्या खरेदी केली होती. शुटींग दरम्यान आराम करण्यासाठी शाहरुख खान वोल्वोची लक्झरी व्हॅनिटी व्हॅन बीआर ९ वापरतो. हि व्हॅनिटी व्हॅन प्रसिद्ध डीसी डिझाइनद्वारे मॉडिफाई केली आहे.अजय देवगन :- अजय देवगन बॉलीवूडमधील अॅरक्शन चित्रपटामधील आपल्या दमदार भूमिकेमुळे ओळखला जातो. त्याची व्हॅनिटी व्हॅन सर्वात वेगळी दिसते कारण याला स्टार ट्रेक च्या धर्तीवर डिझाइन केले आहे. त्याचे इंटीरियर खूपच लक्झरीयस आहे. यामध्ये टीव्ही स्क्रीन, बाथरूम, किचन, बेडरूम, ऑफिस स्पेस सारख्या सुविधा आहेत.अक्षय कुमार :- कॉमेडी चित्रपट असो किंवा सिरीयल एक्टिंग, अक्षय कुमार दोन्हीहि क्षेत्रामध्ये तरबेज आहे. चित्रपटाच्या बराच काळ शुटींग नंतर ब्रेकमध्ये अक्षय कुमार आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आराम करने पसंत करतो. त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये एक मोठा लाईटवर चालणारा इंक्लाइनर, एक बेडरूम आणि एक मेकअप रूम आहे. मिटिंगसाठी एक वेगळी मिटिंग रूमची व्यवस्था देखील आहे.वरुण धवन :- वरुण धवन बॉलीवूड जगतातील एक उगवता अभिनेता आहे. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. वरुणने आपल्या व्हॅनिटी व्हॅनला पूर्णपणे घरासारखे डिझाइन केले आहे. त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये घरासारख्या सुविधा आहे. त्याने यामध्ये एक इम्पोर्टेड जकूजीसुद्धा लावला आहे, याचबरोबर अनेक आधुनिक गॅझेट देखील यामध्ये लावले गेले आहेत. शुटींग दरम्यान ब्रेकमध्ये वरुण या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आराम करतो.ऋतिक रौशन :- ऋतिक बॉलीवूडमधील सर्वात महागड्या कलाकारांपैकी एक आहे आणि लक्झरी कार्सचा शौकीन देखील आहे. ऋतिकने आपल्या १२ मीटरच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये काही खास बदल केले आहेत. या व्हॅनमध्ये लाऊंजसोबत ४ इंक्लाइनर, टीव्ही स्क्रीन आणि जकुजी सुद्धा आहे.सोनम कपूर :- सोनम कपूरची व्हॅनिटी व्हॅन खूपच उत्कृष्ठ आहे. तिची व्हॅनिटी व्हॅन आतमधून एका सेटअपसारखी दिसते आणि यामध्ये एक बेडरूम, एक मेकअप रूम आणि एक मोठी बसण्याची जागा आहे. सोनंमने केबिनमध्ये आधुनिक एलईडी लाईट आणि एंबियंट लाईट लावून घेतली आहे. ताजे जेवण तयार करण्यासाठी यामध्ये एक लहान पाकगृह देखील आहे.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *