वधू बनण्याचे स्वप्न प्रत्येक मुलीचे असते. सामान्यत: हे स्वप्न लग्नाच्या दिवशीच पूर्ण होते. कुमारी असलेल्या मुलीला कधी वधू बनण्याची संधी मिळत नाही. तथापि अभिनय करणाऱ्या अभिनेत्रींच्या बाबतीत असे नसते. चित्रपटाच्या स्क्रिप्टनुसार अभिनेत्री कुमारी असून देखील वधूचा गेटअप घालून तयार होतात. अशामध्ये त्यांना लग्न न करता देखील वधू बनण्याचा फील मिळतो. आज आपण बॉलीवूडच्या ८ अशा कुमारी अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या वधूच्या लुकमध्ये खूपच सुंदर दिसतात.

सारा अली खानसारा अली खान नवीन जनरेशनच्या अभिनेत्रींपैकी सर्वात जास्त पसंत केल्या जाणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. साराने केदारनाथ चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटामध्ये सारा वधूच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाली होती. वधूच्या अवतारामध्ये सारा खूपच सुंदर दिसते. तिला पाहिल्यानंतर कोणताही मुलगा तिला लग्नासाठी नाही म्हणणार नाही.

आलिया भट्टआलिया भट्ट बॉलीवूडमधील सर्वात क्युट अभिनेत्री आहे. सध्या आलिया भट्ट बॉलीवूडचा हँडसम अभिनेता रणबीर कपूरला डेट करत आहे. अशी आशा केली जात आहे कि हे लव्ह बर्ड्स लवकरच लग्नाच्या बंधनामध्ये अडकणार आहेत. आलीय ६ चित्रपटांमध्ये वधूच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाली होती. वधूच्या ड्रेसमध्ये आलिया खूपच निरागस आणि सुंदर दिसते.

कॅटरिना कैफकॅटरिना कैफला बॉलीवूडची ब्युटी क्वीन म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कॅटरिना सध्या बॉलीवूड अभिनेता विक्की कौशलसोबत रिलेशनशिप आहे. वधूचा ड्रेस घातल्यानंतर कॅटरिना एकदम परफेक्ट दिसते. मन करते कि तासनतास तिला न्याहाळत बसावे.

कियारा आडवाणीकबीर सिंह आणि गुड न्यूज सारख्या चित्रपटांमधून चर्चेमध्ये आलेली कियारा आडवाणी देखील सौंदर्याच्या बाबतीत मागे नाही. कियारा तीन चित्रपटांमध्ये वधूच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाली होती. वधूच्या ड्रेसमध्ये कियारा स्वर्गातील परिपेक्षा सुंदर दिसते.

कृती सॅनोनकृती सॅनोनची सुंदरता देखील पाहण्यासाठी आहे. कृती लुका छिपी चित्रपटामध्ये कार्तिक आर्यनची वधू बनली होती. हा चित्रपट दर्शकांना खूपच पसंत आला होता. यानंतर कृती अर्जुन कपूरच्या पानीपत चित्रपटामध्ये एका पारंपारिक मराठी वधूच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाली होती. हा लुक कृतीला खूपच चांगला दिसत होता.

जान्हवी कपूरजान्हवी कपूरने धडक चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली होती. या चित्रपटामध्ये ती ईशान खट्टरची वधू बनली होती. २३ वर्षीय जान्हवी वधूच्या गेटअपमध्ये खूपच स्वीट आणि सुंदर दिसते.

सोनाक्षी सिन्हासोनाक्षीने सलमान खानसोबत दबंग चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटामध्ये ती वधूच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाली होती. याशिवाय ती इतर अनेक चित्रपटांमध्ये देखील ब्राईडल लुकमध्ये दिसली होती. वधूचा ड्रेस घालून सोनाक्षीची सुंदरता आणखीनच वाढते.

भूमि पेडनेकरभूमि नेहमी वेगवेळ्या प्रकारच्या भूमिका करताना पाहायला मिळत असते. टॉयलेट चित्रपटामध्ये ती अक्षय कुमारच्या वधूच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाली होती. याशिवाय तिने इतर अनेक चित्रपटांमध्ये वधूचा मेकअप केला आहे.