आपले बुडते करियर वाचवण्यासाठी बोल्डनेसच्या सर्व हद्द पार करून बसल्या या अभिनेत्री !

3 Min Read

बॉलीवूड फिल्मी जगतामध्ये अभिनेत्यांच्या तुलनेमध्ये अभिनेत्रींचे फिल्मी करियर लवकर संपुष्टात येते आणि एक वयानंतर हिरोईनसाठी चांगली भूमिका मिळणे कमी होऊ लागते. अनेक अभिनेत्री आपल्या करियरच्या सुरुवातीला खूपच बोल्ड सीन देतात आणि फिल्मी जगतामध्ये आपले स्थान निर्माण केल्यानंतर अशाप्रकारचे रोल करण्यापासून वाचतात. पण काही हिरोईन आपले बुडते करियर वाचवण्यासाठी बोल्ड सीनची मदत घेऊ लागतात. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबदल जाणून घेणार आहोत ज्यांचे करियर संपुष्टात येत आहे असे समजल्यानंतर त्यांनी अनेक बोल्ड सीन दिले. चला तर जाणून घेऊया या अभिनेत्रींबद्दल.

राणी मुखर्जी :- बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री राणीने आपल्या फिल्मी करियरमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका केल्या. राणीचे करियर बराच काळ चांगले राहिले आणि आज देखील ती चित्रपटांमध्ये अॅक्टिव्ह आहे. तथापि २००० मध्ये हे राम चित्रपटामध्ये कमल हासनसोबत तिने अनेक बोल्ड सीन दिले होते. या सीन वर आणि चित्रपटाच्या नावावर अनेकी वाद निर्माण झाले होते.तब्बू :- बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू नेहमीच इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख बनवून राहिली. नुकतेच प्रदर्शित झालेल्या तिच्या अंधाधुन चित्रपटाने अंधाधुन कमाई केली आहे आणि वर्षातील सर्वात उत्कृष्ठ अभिनेत्री बनली आहे. तिने हेरा फेरी सारख्या चित्रपटामध्ये एक सरळ साध्या मुलीची भूमिका साकारली होती तर चाची ४२० मध्ये तिने आपल्या अभिनयाने दर्शकांचे मन जिंकले होते. तथापि २००३ मध्ये तब्बूने एका तमिळ चित्रपट राजा लिलाईमध्ये खूपच बोल्ड आणि रोमँटिक सीन दिले होते. तब्बूला त्यावेळी चित्रपट मिळत नव्हते.
रवीना टंडन :- बॉलीवूडची मस्त मस्त गर्ल बनून लोकांचा मनावर राज्य करणारी अभिनेत्री रविनाचे करियर चांगले राहिले पण एक वेळ अशी होती कि तिचे चित्रपट कमी झाले होते. यानंतर ३८ व्या वर्षी तिने आपले करियर वाचवण्यासाठी एका चित्रपटामध्ये चिरंजीवीसोबत बोल्ड सीन दिले होते.
जरीन खान :- बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खानसोबत वीर चित्रपटामधून फिल्मी जगतामध्ये येणारी अभिनेत्री जरीन खान अजून देखील बॉलीवूडमध्ये आपले करियर बनवण्यामध्ये व्यस्त आहे. तिचे करियर अजून देखील व्यवस्थित झालेले नाही यामुळे जरीनने बोल्ड सीन देऊन चित्रपट सुरु केले. तिने हेट स्टोरी ३ चित्रपटामध्ये डेजी शाह सोबत बोल्डनेस दाखवण्यात तगडे कॉम्पटिशन दिले होते.
रेखा :- बॉलीवूडमध्ये आपल्या चित्रपटांसोबत इवेंट आणि अॅमवॉर्ड फंक्शन्समध्ये अॅक्टिव्ह राहणारी रेखा नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेमध्ये राहिली. तिच्या अभिनयाचे आजदेखील लोक दिवाने आहेत. रेखाने खूपच उत्कृष्ठ चित्रपट केले आहेत. तथापि तिने देखील बोल्ड सीन करण्यास मागेपुढे पाहिले नाही आणि वाढत्या वयासोबत आणि बुडत्या करियरसोबत खूपच बोल्ड सीन दिले ज्यानंतर खूपच वाद निर्माण झाले. इतकेच नाही रेखाने अक्षय कुमारसोबत देखील खूप बोल्ड सीन दिले होते आणि त्यावेळी तिचे वय ४० च्या पुढे होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *