डायना पेंटी भलेहि बॉलीवूडमध्ये अद्यापही यशस्वी झालेली नाही परंतु तिची लोकप्रियता एखाद्या हिरोईनपेक्षा काही कमी नाही. डायना दिसायला खूपच सुंदर आहे. तिने आतापर्यंत काहीच चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु ज्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे, दर्शकांनी तिच्या कामाचे खूपच कौतुक केले आहे. काही दिवसांपासून डायना पुन्हा चर्चेमध्ये आली आहे. परंतु ती यावेळी चर्चेमध्ये आपल्या चित्रपटांमुळे नाही तर आपल्या काही फोटोंमुळे आहे.

काही दिवसांपूर्वी डायनाचे काही फोटो समोर आले होते. डायना आता जितकी सुंदर दिसते तितकीच ती लहानपणीसुद्धा खूपच सुंदर होती. सोशल मिडियावर डायनाचे हे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत. या बालपणातील फोटोमध्ये डायना खूपच गोंडस दिसत आहे.डायनाचा जन्म मुंबईमध्ये एका पारसी आणि ख्रिश्चन कुटुंबात झाला होता. डायनाला लहानपणापासून मॉडेलिंगची खूप आवड होती. यामुळे खूपच कमी वयामध्ये तिने मॉडेलिंग सुरु केले होते. लहानपणापासूनच ती खूप सुंदर असल्यामुळे तिला मॉडेलिंगच्या ऑफर्स सहज मिळायच्या.डायनाने आतापर्यंत जास्त चित्रपटांमध्ये काम केलेले नाही. परंतु ज्या चित्रपटांमध्ये ती दिसली आहे दर्शकांनी तिला खूपच पसंत केले आहे. तरीही ती तिथपर्यंत पोहोचू शकली नाही जिथे प्रत्येक हिरोईनचे पोहोचण्याचे स्वप्न असते. डायनाने कॉकटेल चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत दीपिका पादुकोण आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेमध्ये होते. त्यावेळी दीपिका आणि डायना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाल्या होत्या. तेव्हा लोकांचे असे म्हणणे होते कि दोघींचा चेहऱ्यामध्ये बरेच साम्य आहे.