अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे प्रेम प्रकरण बॉलिवूड जगतात आता सध्या खूपच चर्चेत आहे. कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण मलायका अरोरा ही अर्जुन कपूरपेक्षा जवळपास 12 वर्षांनी मोठी आहे. या दोघांचे लग्न होणार असल्याच्या बातम्या आता सतत येत आहेत. तुम्हाला माहीत नसेल पण अशा बर्याआच अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्यापेक्षा लहान अभिनेत्यासोबत रिलेशनशिप मध्ये राहिल्या आहेत, चला तर मग आपण अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊया!

1) उर्मिला मातोंडकर :- आपल्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने स्वत:पेक्षा १० वर्षाने लहान अभिनेता मोहसीन अख्तर मीरशी केले होते.2) अर्चना पूरन सिंग :- टीव्ही अभिनेत्री अर्चना पूरन सिंहने परमित सेठीशी लग्न केले आहे. अर्चना आपल्या पतीपेक्षा ७ वर्षाने मोठी आहे, दोघांनी १९९२ मध्ये अगदी थाटामाटात लग्न केले होते.3) ऐश्वर्या राय :- बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायने अभिनेता अभिषेक बच्चनशी २००७ मध्ये लग्न केले. आपल्याला कदाचित माहित हे नसेल परंतु ऐश्वर्या राय ही अभिषेकपेक्षा २ वर्षाने मोठी आहे.4) शिल्पा शेट्टी :- बॉलिवूडची सर्वात तंदुरुस्त आणि सुंदर अभिनेत्री म्हणजेच शिल्पा शेट्टी ही तिचा पती राज कुंद्रापेक्षा ३ महिन्याने मोठी आहे. २००९ मध्ये शिल्पा शेट्टीने राज कुंद्राशी लग्न केले होते. राज कुंद्रा एक बिझनेसमन असून शिल्पा शेट्टी ही त्याची दुसरी पत्नी आहे.5) प्रियांका चोप्रा :- बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने २०१८ मध्ये अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केले. परंतु प्रियंका चोप्रा ही तिचा पती निकपेक्षा १० वर्षाने मोठी आहे. असे असूनही लोकांनी या जोडीवर खूप प्रेम केले आहे.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.