एखादी व्यक्ती जेव्हा एकटी असते तेव्हा त्याला आपल्या आयुष्यामधील अनेक चुका आठवतात. असे अनेक बॉलीवूड कलाकारांच्या सोबत झाले आहे आणि याबद्दल ते कधीना कधी विचार करतातच. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टार बद्दल सांगणार आहोत जिच्यासोबत असेच काही घडले होते.

बॉलीवूड अभिनेत्री रीना रॉयसोबत देखील असेच झाले होते आणि एका चुकीमुळे तिला आज देखील पश्चात्ताप होत आहे. यामुळे तिचे पूर्ण आयुष्य बदलले आहे. एका चुकीमुळे रिया रॉयचे आयुष्य बदलले आणि ती चूक कोणती होती हे आपण जाणून घेऊया.

एका चुकीमुळे बदलले रीना रॉयचे आयुष्य :- ८० च्या दशकातील प्रसिद्द अभिनेत्री रीना रॉयने ज्यावेळी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खानसोबत लग्न केले त्यावेळी तिने बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. हा तो काळ होता जेव्हा तिचे करियर उत्कृष्ठ चालले होते आणि ती आपल्या बोल्ड अंदाजामुळे ओळखली जात होती.

निर्माता-दिग्दर्शक तिला मागेल ती रक्कम देऊन आपल्या चित्रपटामध्ये घेऊ इच्छित होते आणि बॉक्स ऑफिसवर सुद्धा तिचे चित्रपट बक्कळ कमाई करत होते. पण मोहसीनच्या प्रेमामध्ये बुडलेल्या रीना रॉयने तिचे करियर आणि प्रसिद्धीला ठोकर मारली आणि हिंदुस्तानातून कायमची निघून गेली.पाकिस्तानमध्ये तिने आपल्या नवीन आयुष्याची सुरवात केली पण तिच्या नशिबाने तिला साथ दिली नाही. त्यानंतर तिला समजले कि तिचा हा निर्णय खूप चुकिचा होता आणि ती पुन्हा भारतामध्ये परतली. रीना रॉयने या गोष्टीचा खुलासा स्वतः एका मुलाखतीमध्ये केला आहे.

प्रेमाच्या मोहामध्ये ती सर्व काही गमावून बसली जे तिने कठोर परिश्रम घेऊन मिळवले होते. ८० च्या दशकामध्ये रीना रॉयला बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्री मानले जात होते पण लग्न केल्यानंतर तिने सर्व काही सोडले आणि हीच तिची सर्वात मोठी चूक ठरली.

७ जानेवारी १९५७ रोजी जन्मलेल्या रीना रॉयने आपल्या करियरची सुरवात १९७३ मध्ये आलेल्या नई दुनिया या चित्रपटामधून केली होती परंतु हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. यानंतर त्याचवर्षी तिचा जैसे को तैसा हा चित्रपटा प्रदर्शित झाला होता जो हिट ठरला होता.

१९७६ मध्ये तिचा कालीचरण हा चित्रपट प्रदर्शित झाला होता जो सुपरहिट झाला आणि यामध्ये रीना पहिल्यांदा शत्रुघ्न सिन्हासोबत दिसली होती आणि नंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांचे लव्ह अफेयर देखील बरीच वर्षे होते पण नंतर शत्रुघ्न सिन्हाने पूनम नावाच्या मुलीसोबत लग्न केले.रीना रॉयने बॉलीवूडमध्ये आशा, नागिन, अरपन, अपनापन, जानी दुश्मन, आदमी खिलौना है, प्रेम तपस्या, बदलते रिश्ते, नसीब, धर्म कांटा, बदले की आग, आशा ज्योति, प्यासा सावन, विश्वनाथ, उधार का सिंदूर, सौतन आणि सौ दिन सास के सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. रीना रॉय आता आपल्या एकुलत्या एक मुलीसोबत मुंबईमध्ये राहते आणि तिची मुलगी डायरेक्शनच्या कामामध्ये सक्रीय आहे.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.