तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या कमाईच्या बाबतीत आपल्या पतीपेक्षाहि एक पाउल पुढे आहेत. या अभिनेत्रींच्या कमाईच्या चर्चा फिल्म इंडस्ट्रीमध्ये नेहमी होत असते, त्याचबरोबर चाहत्यांमध्ये देखील यांची खूपच चर्चा असते. चला तर जाणून घेऊयात बॉलीवूडमधील या अभिनेत्रींबद्दल.

बिपाशा बसूजवळ आहे इतकी संपत्ती :- कमाईच्या बाबतीत बिपाशा बसू कोणापेक्षाही कमी नाही. बिपाशाची कमाई तिच्या पतीपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. बिपाशा बॉलीवूडमधील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. बिपाशा बसूने २०१६ मध्ये करण सिंह ग्रोवर सोबत लग्न केले होते. करण बिपाशापेक्षा वयाने लहान आहे. बिपाशा बसू १०० करोड रुपये संपत्तीची मालकीण आहे. या तुलनेने तिचा पती कमाईच्या बाबतीत खूपच मागे आहे.रणवीरपेक्षा जास्त कमावते दीपिका :- दीपिका पादुकोणने आपल्या करियरची सुरवात शाहरुख खानच्या ओम शांति ओम चित्रपटामधून केली होती. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. दीपिका आज बॉलीवूडमधील एक सफल अभिनेत्री आहे. दीपिका आणि रणवीर सिंहने गेल्या वर्षी २०१८ मध्ये लग्न केले होते. खास गोष्ट हि आहे कि दीपिका बॉलीवूडमध्ये रणवीर सिंहपेक्षा तीन वर्षाने सिनियर आहे. कारण ती रणवीरच्या आधीपासून बॉलीवूडमध्ये काम करते. तर पती रणवीरने २०१० मध्ये बँड बाजा बारात या चित्रपटामधून डेब्यू केला होता. दीपिका आपला पती रणवीर सिंह पेक्षा कमाई आणि संपत्तीच्या बाबतीत खूपच पुढे आहे.
साउथची समांथा अक्किनेनी सुद्धा काही कमी नाही :- कमाईच्या बाबतीत साउथच्या अनेक अभिनेत्री बॉलीवूड अभिनेत्रींना टक्कर देतात. अशीच एक साउथ अभिनेत्री समांथा अक्किनेनी आहे. साउथमधील प्रसिद्ध आणि टॉप अभिनेत्रींपैकी ती एक आहे. समांथाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने नागा चैतन्य लग्न केले आहे. नागा सुद्धा साउथचा एक हिरो आहे जो कमाईच्या बाबतीत आपली पत्नी समांथापेक्षा खूपच मागे आहे.सोहा आहे खानदानी श्रीमंत :- सोहा अली खान भलेहि कमी चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली पण कमाईच्या बाबतीत ती कोणत्याही इतर अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. इतके नाही तर कमाईच्या बाबतीत ती आपल्या पतीला देखील मागे टाकते. सोहा शर्मिला टागोरची मुलगी आणि अभिनेता सैफ अली खानची बहिण आहे. सैफचे खानदान नवाबांचे खानदान आहे, ज्यांची स्वतःची रियासत होती. त्यांचा अलिशान राजवाडा आजही आहे. सोहा आपल्या आपल्या पूर्वजांची संपत्ती सांभाळते ज्याचे मुल्यांकन केले तर तिचा पती आणि अभिनेता कुणाल खेमूपेक्षा खूपच जास्त आहे.बच्चन परिवाराची सून देखील कमाईच्या बाबतीत मागे नाही :- ऐश्वर्या राय बॉलीवूडमधील अशी अभिनेत्री आहे जी कमाईच्या बाबतीत आपला पती अभिषेक बच्चन पेक्षा जास्त कमाई करते. विश्व सुंदरीचा किताब मिळवलेली ऐश्वर्या राय अभिनयामध्ये देखील मागे नाही. ऐश्वर्या रायने २००७ मध्ये अमिताभ बच्चनचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन सोबत लग्न केले होते. अभिषेक बच्चन भलेहि बॉलीवूडमध्ये सफल होऊ शकला नाही पण ऐश्वर्यासोबत असे झाले नाही. ती तिच्या काळामधील एक हाइएस्ट पेड अभिनेत्री राहिली आहे. ती बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. सूत्रांनुसार अभिनेत्री ऐश्वर्या रायजवळ ३० मिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. बच्चन परिवारातील ती अमिताभ बच्चननंतर सर्वाधिक कमाई करणारी सदस्य आहे.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.