असे म्हंटले जाते कि प्रेम आंधळे असते. कारण प्रेम करणारे जात आणि धर्म मानत नसतात. प्रेमासाठी लोक खूप काही करायला तयार असतात. आज आम्ही आपल्याला अश्याच ६ अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत ज्यांनी सीमापलीकडील राहणाऱ्या व्यक्तींबरोबर लग्न केले आहे.

१) प्रियंका चोपड़ा :- बॉलीवुडची देसी गर्ल प्रियंका चोपड़ा ने २०१८ मध्ये अमेरिकन गायक निक जोनस सोबत जोधपुरच्या उम्मेद भवन मध्ये लग्न केले होते. या आधी त्यांनी काही काळ एक्मेकांसोबत रिलेशनमध्येहोते. त्याचबरोबर सोशल मीडियावर यांच्या जोडीला लोकांनी खूप पसंती दिली. दोघांनी केलेले फोटोशूट असो या त्यांचा एखादा विडिओ लगेचच वायरल होतो.२) प्रीति जिंटा :- बॉलीवुडची डिंपल गर्ल प्रीति जिंटा ने अमेरिकन बिजनेस टायकून जेने गुडइनफ सोबत काही वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी वर्ष २०१८ मध्ये लग्न केले. अधूनमधून ती मुंबईत येत असते. प्रीतीचा नवरा जेने हा एक फायनॅन्शिअल अॅनालिस्ट आहे.३) सेलिना जेटली :- बॉलीवुडमधील सगळ्यात बोल्ड एक्ट्रेस सेलिना जेटलीला आपण अपना सपना मनी मनी मध्ये पाहिले होते त्यात तिने केलेली भूमिका लोकांना आवडली होती. त्यानंतर काही सिनेमा नंतर ती गायबच झाली. सेलिना हिने ऑस्ट्रियाचा राहणारा होटेलियर पीटर हागसोबत २०१०मध्ये साखरपुडा तर २०११मध्ये लग्न केले आणि सध्या सेलिना आपल्या पतीसोबत दुबई येथे राहत आहे.४) माधुरी दीक्षित :- ९० च्या दशकातील सर्वात सुंदर आणि हुशार अभिनेत्री तसेच लाखो हृदयाची धक धक गर्ल माधुरी दीक्षितने साल १९९९ मध्ये यूएस येथे राहणारे भारतीय मूल निवासीचे कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर श्रीराम नेने सोबत लग्न करून आपला संसार थाटला. लग्न झाल्यानंतर काही काळ माधुरीने स्वतःला या इंडस्ट्रीपासून लांब राहिली पण सध्या माधुरी आपल्याला अनेक रियालिटी शो तसेच जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला टीव्ही वर दिसतेय.५) श्रेया शरन :- दाक्षिणात्य चित्रपट आणि और बॉलीवुडमध्ये अनेक चित्रपटात काम केलेली अभिनेत्री श्रेया शरन ने गेल्यावर्षी बॉयफ्रेंड अँड्रेय कोसचिव सोबत लग्न केले होते. अँड्रेय हे प्रसिद्ध टेनिस खेळाडू व प्रसिद्ध उद्योजक आहे.६) कश्मिरा शाह :- कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा शाहचे पहिले लग्न २००२ मध्ये अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकर आणि निर्माता ब्रॅड लिस्टरमनसोबत झाले होते. सहा वर्षे दोघांचे लग्न टिकले. २००७ मध्ये दोघे घटस्फोट घेऊन कायदेशीररित्या विभक्त झाले. त्यानंतर २०१३ मध्ये कश्मिराने अभिनेता गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेकसोबत लग्न थाटले.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.