बॉलीवूडच्या जगतामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सामान्य माणसाच्या आकलनापलिकडे आहेत. या जगामध्ये नाती बनने आणि तुटने काही नवीन नाही. प्रत्येक दुसऱ्या दिवशी कोणाचेना कोणाचे ब्रेकअप होण्याच्या बातम्या येत असतात. आज आम्ही बॉलीवूडच्या काही अशा कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या अफेयरच्या चर्चा खूपच झाल्या. एंगेजमेंट झाली, पण लग्न होण्याअगोदर त्यांचे नाते तुटले. चला तर जाणून घेऊया आजच्या या पोस्टमध्ये काय खास आहे.

विवेक ओबेरॉय आणि गुरप्रीत गिल :- विवेक ओबेरॉय त्याची गर्लफ्रेंड गुरप्रीतमुळे खूपच चर्चेमध्ये राहिला होता. त्याने एंगेजमेंट तर केली होती पण नंतर त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि लग्नाच्या अगोदर त्यांचे ब्रेकअप झाले.अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर :- अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांची एंगेजमेंट २००२ मध्ये झाली होती. परंतु काही कारणामुळे त्यांचे नाते तुटले. असे म्हंटले जाते कि बच्चन कुटुंब आणि करिश्माच्या आईमधील मतभेदांमुळे त्यांची एंगेजमेंट तुटली होती.सलमान खान आणि संगीता बिजलानी :- सलमान खान आणि संगीता बिजलानी यांच्या अफेयरच्या चर्चा त्यावेळी खूपच गाजल्या होत्या, ते बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचे लग्न देखील होणार होते, पण अचानक ते वेगळे झाले. असे म्हंटले जाते कि त्यांच्या लग्नपत्रिका देखील छापल्या गेल्या होत्या.
शिल्पा शिंदे आणि रोमित राज :- शिल्पा शिंदेने रोमित राजसोबत एंगेजमेंट केली होती. त्यांच्या लग्नाच्या लग्नपत्रिका देखील छापल्या गेल्या होत्या पण लग्नाच्या काही दिवसांअगोदर त्यांच्यामधील भांडणे खूप वाढली आणि शिल्पाने लग्न करण्यास नकार दिला. त्यावेळी शिल्पा खूपच चर्चेमध्ये राहिली होती.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.