बॉलिवूड फिल्म जगतामध्ये अशा अनेक सुंदर जोड्या आहेत, ज्यांनी स्वत:च्या हिम्मतीवर करोडो रूपये कमावले आहेत. अशामध्ये आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशा ७ जोड्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी सर्वाधिक कमाई केली आहे. चला त्यांच्याबद्दल जाणून घेउूया.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन :- बॉलिवूडमधील सुंदर कपल ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन हे दोघेही फिल्म इंडस्ट्रीतील नामांकीत स्टार आहेत, या जोडीने गेल्या वर्षी २१ कोटींची कमाई केली होती. ऐश्वर्या रायने ११ कोटी तर अभिषेक बच्चनने १० कोटींची कमाई केली होती.सैफ अली खान आणि करीना कपूर :- बॉलिवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खानने सेक्रेड गेम्समधून चांगली कमाई केली आहे. गेल्या वर्षी करीना कपूरने २२ कोटी रूपये तर सैफने ३३ कोटी असे दोघांनी एकूण ५५ कोटी रूपये कमावले आहेत.
काजोल आणि अजय देवगन :- २०२० मधील तान्हाजी हा सुपरहिट चित्रपट देणारी जोडी अजय आणि काजोल यांना खुप वर्षानंतर एकत्र पडद्यावर पाहिले गेले. ह्या सुपरस्टार जोडीने गेल्या वर्षी ८७ कोटींची कमाई केली होती. ज्यामध्ये काजोलने १२ कोटी तर अजयने ७५ कोटी इतकी कमाई केली आहे.दिपिका पादुकोण आणि रणवीर सिंह :- बॉलिवूडची पॉपुलर जोडी रणवीर सिंह आणि दिपिका पादुकोण फिल्म जगतातील नामांकीत कलाकारांच्यापैकी एक जोडी आहे, या दोघांनी गेल्या वर्षात २०० कोटी रुपये कमावले होते, ज्यामध्ये रणवीरने ११५ कोटी तर दिपीकाने ८५ कोटी कमावले आहेत.अमिर खान आणि किरण राव :- बॉलिवुड फिल्म इंडस्ट्रीचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा थग्स ऑफ हिंदुस्थान पूर्णपणे फ्लॉप ठरला. पण तरीही त्याने करोडो रूपयांची कमाई केली आहे, तर त्याची पत्नी किरण एक दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहे. गेल्या वर्षी आमिरने १८५ कोटी आणि किरणने २० कोटी असे दोघांनी मिळून एकूण २०५ कोटींची कमाई केली आहे.शाहरूख खान आणि गौरी खान :- बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा भले ही मागील चित्रपट जीरो फ्लॉप झाला असेल. पण त्याच्या कमाई मध्ये जरासुद्धा घट झालेली नाही. शाहरूख कोलकाता नाइट रायडर्सचा मालक आहे. गेल्या वर्षी त्याचे उत्पन्न २४० कोटी होते आणि गौरीचे २० असे दोघांचे मिळून एकूण २६५ कोटी इतके उत्पन्न होते.
ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार :- बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना या जोडीने गेल्या वर्षी सर्वात जास्त कमाई केली होती या जोडीने ४८५ कोटी रुपये इतकी घसघशीत कमाई केली होती. फोर्ब्सच्या माहितीनुसार अक्षयने ४६६ करोड तर ट्विंकलने १९ करोडची कमाई केली होती.