बॉलीवूडमधील सुपरस्टार शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या कबीर सिंह या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातली होती, लोकांना हा चित्रपट खूपच पसंत आला, चित्रपटामध्ये दोन्ही कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक झालेच त्याचबरोबर चित्रपटामध्ये एक सीन आहे, ज्याला खूपच प्रसिद्धी मिळाली आणि ज्याचे सोशल मिडियावर खूप मिम्स बनले.चित्रपटामध्ये एक सीन आहे ज्यामध्ये शाहिद कपूरच्या कामवालीच्या हातामधून ग्लास खाली पडून फुटतो, तेव्हा तो तिच्या मागे धावतो. हा सीन लोकांना खूपच पसंत आला होता आणि लोकांना खूपच हसवले आहे. अशामध्ये आज आम्ही तुम्हाला चित्रपटामधील कामवालीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत आणि तिचे रियल फोटो देखील तुमच्यासोबत शेयर करणार आहोत जे पाहून तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही कि हा त्या कामवालीचा फोटो आहे.कबीर सिंहमध्ये कामवालीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव वनिता खराट आहे आणि प्रत्यक्षात ती चित्रपटामधील कामवालीपेक्षा खूपच पातळ आहे. तिचा खरा फोटो पाहून तुम्हाला असे वाटेल कि चित्रपटामध्ये ती यापेक्षाहि चांगले करू शकत होती. असो, आम्ही अशा करतो कि भविष्यात तिला याहीपेक्षा उत्कृष्ठ आणि दमदार भूमिका मिळावी. ती वास्तवात खूपच सुंदर आहे.शाहिद कपूरने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि कबीर सिंहची भूमिका साकारणे त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक होती. त्याने सांगितले कि, कबीर सिंह माझ्यासाठी इमोशनली आणि फिजिकली खूपच जास्त आव्हानात्मक आहे. चित्रपटामध्ये माझे तीन वेगवेगळे लुक आहेत. मला अनेक वेळा शांत स्वभावा पासून अग्रेसिवनेस पर्यंत ट्रांसफोर्म केले गेले. मला अनेक सिगारेट ओढाव्या लागल्या, तथापि जेव्हा सुद्धा माझ्या केरेक्टरची मागणी होती, माझे दिग्दर्शक त्यांना जसे पाहिजे होते, मी तसे करण्यापूर्वी पहिला दोनवेळा देखील विचार केला नाही. मला ती भूमिका पसंत आहे जी मला आव्हान देते.