३३ वर्षांपूर्वी 28 नोव्हेंबर 1986 रोजी आलेला नगिना हा सिनेमा सगळ्यांच्याच लक्षात आहे. एका इच्छाधारी नागणी वर आधारित या सिनेमात श्रीदेवी, ऋषी कपूर आणि अमरीश पुरी या दिग्गज कलाकारांनी काम केले होते. या चित्रपटात श्रीदेवी यांनी एका इच्छाधारी नागिणी ची भूमिका निभावली होती तर अमरीश पुरी एका शैतान सपेराच्या भूमिकेत दिसले होते‌.

या चित्रपटाचे दिग्दर्शन हर्मेश मल्होत्रा यांनी केले होते तर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी हा चित्रपट संगीतबद्ध केला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 40 करोडचा गल्ला जमवला होता. आणि गंमत म्हणजे हा संपूर्ण चित्रपट बनवण्यासाठी केवळ तेरा करोड चा खर्च आला होता.

त्यामुळे या चित्रपटाचा चांगलाच नफा झाल्याचे दिसून येते. या चित्रपटातील श्रीदेवीची इच्छाधारी नागिण ही भूमिका त्या वेळी प्रेक्षकांनी फारच डोक्यावर उचलून घेतली होती. परंतु या चित्रपटातील काही अशा गोष्टी आहेत ज्या नजर चुकीमुळे तुम्हाला जाणवल्या नसतील. आज आम्ही तुम्हाला नागिण या चित्रपटातील त्या गोष्टी दाखवणार आहोत.

१) जेव्हा जेव्हा बॉलिवूडमध्ये नागिन असा शब्द उच्चारला जातो तेव्हा सगळ्यांच्या तोंडी श्रीदेवीचे नाव येते. श्रीदेवीने ही भूमिका इतकी सुंदर निभावली होती की ती खरोखरच इच्छाधारी नागिण आहे का असा प्रश्न पडला तरी वावगे वाटणार नाही. चित्रीकरणादरम्यान श्रीदेवी हिने खऱ्या सापां बरोबर स्टंट केले होते.

२) नगिना चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान श्रीदेवी यांना इच्छाधारी नागणेची भूमिका साकारायची असल्यामुळे त्यांनी डोळ्यांवर वेगवेगळ्या लेन्स चा वापर केला होता. त्यामुळे इन्फेक्शन होऊन त्यांचे डोळे खूपच खराब झाले होते. ज्याचा त्यांना चित्रपटाच्या चित्रीकरणाला नंतर खूप त्रास देखील होऊ लागला होता.

३) हा चित्रपट करायचा असे जेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक हरमेश मनोत्रा यांच्या मनात आले त्यावेळी त्यांची पहिली पसंती ही श्रीदेवी नसून जयाप्रदा या होत्या. परंतु जेव्हा त्यांना समजले की या चित्रपटात खऱ्याखुऱ्या सापांबरोबर शूट करायचं आहे त्यावेळी त्यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला. आणि त्यानंतर हा सिनेमा श्रीदेवी यांना मिळाला.

४) नगिना या चित्रपटाला मिळालेले भरघोस यश बघता चित्रपटाचे दिग्दर्शक हर्मेश मल्होत्रा यांनी या चित्रपटाचा रिमेक काढण्याचे ठरवले. म्हणून 1989 साली त्यांनी श्रीदेवी व सनी देओल यांना घेऊन नगिना पार्ट 2 हा सिनेमा बनवला. परंतु हा सिनेमा पहिल्या पार्टच्या तुलनेत तितकासा चालला नाही.

या चित्रपटातील श्रीदेवीच्या नागिन डांस नंतर सर्वत्र नागिन डांस जी क्रेझ पसरली होती. जागोजागी सर्वजण नागीन डान्स करायला लागायचे. या चित्रपटात श्रीदेवीचा इतका छान डान्स होता की त्या डान्सचा एक प्रकारचा ट्रेंड तयार झाला होता. नगीना या चित्रपटासाठी श्रीदेवी यांना बेस्ट एक्ट्रेसच्या फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित केले होते. या चित्रपटामुळे श्रीदेवी यांना नगीना या नावामुळे ओळखले जायचे.