बॉलिवूडमध्ये शून्यातून विश्व निर्माण करणारे बॉलिवूड अभिनेते !

4 Min Read

एका महान व्यक्तीने म्हटले होते, ‘जर तुम्ही गरीब असाल तर तुमच्यात काही चूक नाही पण जर तुम्ही गरिब म्हणूनच मृत्यू झालात तर त्यात तुमची चूक आहे. ‘गरिबीला श्रीमंत बनविणे आपल्या हातात आहे असे म्हणायचे आहे. आपण आपल्या सद्य परिस्थिती किंवा कुटुंबाला दोष देऊन आपली स्वप्ने पूर्ण न करण्याचे सबब सांगू शकत नाही. आपल्याकडे कौशल्य आणि पुढे जाण्याची इच्छा असल्यास, कोणीही आपल्याला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही.आता उदाहरणार्थ बॉलिवूडमधील हि स्टार्स मंडळी पाहूयात. हे लोक एकेकाळी खूप गरीब होते पण आता कोट्याधीश झाले आहेत.

१. जॉनी लिवर – चित्रपट विश्वात सर्वाना हसवणारे कॉमेडी किंग जॉनी लिवरयांचा जन्म गरीब कुटुंबात झाला. गरिबीमुळे सातवी नंतर त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले. पैसे कमविण्यासाठी रस्त्यावर पेपर विकायचे नंतर प्रचंड मेहनतीच्या आधारावर त्यांनी यश मिळवले व बॉलिवूडमधे आपली विशेष ओळख निर्माण केली. हाऊसफुल, राजा हिंदुस्थानी, अठ्ठनी खर्चा आमदनी रुपय्या, नायक यासारख्या सुपरहिट चित्रपटात सुपरहिट भूमिका साकारल्या आहेत.

२. मिथुन चक्रवर्ती – मिथुन यांच्या जीवनात असा काळ होता की त्यांच्याकडे अजिबातच पैसे नव्हते. ते त्यांचा दिवसाचा खर्च पण भागवू शकत नव्हते. नंतर त्यांनी एका अनोळखी व्यक्ती कडून पैश्याची मदत घेतली आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर आपल्या पायावर उभे राहिले. साध्याकाळात मिथुन यांच्या कडे ३०० कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. उटी, तामिळनाडूमध्ये त्यांचे स्वतःचे एक रेस्टोरंट आहे.

३. अक्षय कुमार – अक्षय कुमार पहिले वेटरचे काम करत आहे. याच काळात अक्षयने मार्शल आर्टची ट्रेनिंग घेतली आणि विद्यार्थ्यांना शिकवायला लागले. याच काळात एका विद्यार्थ्यांच्या वडिलांनी मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला आणि मग अक्षय ने मागे वळून पहिलेच नाही. आज मेहनत करून त्यांनी बॉलीवुडमध्ये नाव कमविले आहे. त्याचबरोबर सर्वाधिक चित्रपट करणारा अभिनेता म्हणून आज अक्षय यांची ओळख आहे. त्यांनी एअरलिफ्ट, पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेम कथा सारखे अनेक सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटात काम केले आहे.

४. रजनीकांत – दाक्षिणात्य चित्रपटाचा देव म्हणून ओळखले जाणारे रजनीकांत इतके गरीब होते की ते बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करत असे. मग त्यांनी कन्नडमधील धार्मिक नाटकांमध्ये भाग घेऊ लागले. यानंतर त्यांनी ‘अपूर्वा रागंगल’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले आणि राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला. तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिले नाही आणि आजपर्यंत ते प्रत्येक चित्रपटात खूप मेहनत घेत आहे. त्यांनी केलेला प्रत्येक चित्रपट आज सुपरहिट झाल्याशिवाय राहत नाही.

५. संजय मिश्रा – बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी संजय मिश्रा यांनीही खूप धडपड केली आहे. एक काळ असा होता की संजय वडा पाव खाऊन पोट भरत असे आणि रेल्वे स्टेशनवर रडत बसत असे. इंडस्ट्री, आर्ट डायरेक्शन, कॅमेरा काम संजयने हे सर्व केले. सुरुवातीला टीव्हीमध्ये अभिनय केला. इथेसुद्धा बर्‍याच वर्षांच्या संघर्षानंतर आज चित्रपटांमध्ये त्यांची प्रतिमा ओळखली जात आहे. आता तो जवळजवळ प्रत्येक चित्रपटात दिसतो. नंतर त्यांच्या मेहनतीला यश आले. त्यांना आखों देखी या चित्रपटासाठी बेस्ट फिल्म क्रिटिक अवॉर्ड मिळाला. त्यांनी अनेक विनोदी भूमिका चित्रपटात केले आहे.

६. नवाज़ुद्दीन सिद्दीकी – नवाजही एका अत्यंत गरीब कुटुंबातून आले आहेत. वरुन नवाज दिसायला एवढा देखणा नाही. असे असूनही नवाज यांनी हार मानली नाही. ते मेहनत करत राहिले. त्यांनी चित्रपटांमधील बर्‍याच किरकोळ भूमिकांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. अखेर दिग्दर्शक अनुराग कश्यपने त्यांची कौशल्ये ओळखली आणि गॅंग ऑफ वासेपुरात महत्त्वाची भूमिका देऊन त्यांना प्रसिद्ध केले. आज बॉलिवूडमध्ये नवाज यांचे खूप मोठे नाव आहे. तसेच त्याचे अनेक चित्रपट आज हिट होत आहे. त्यांनी ठाकरे चित्रपटात साकारलेली हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका उल्लेखनीय होती.

७. अरशद वारसी – चित्रपटात येण्यापूर्वी अरशद घरोघरी सेल्समन म्हणून काम करायचे. त्यांनी फोटो लॅबमध्येही काम केले आहे. मात्र, त्यांच्या प्रचंड इच्छाशक्तीमुळे त्यांनी ही बॉलिवूडमध्ये स्थान मिळवले. त्यानंतर अरशद यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले. सर्किट या विशेष भूमिकेमुळे प्रचंड लिकप्रियता मिळाली. जॉली एल एल बी, इश्किया, मुन्नाभाई एम. बी.बी.एस. यासारख्या चित्रपटात विशेष भूमिका केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *