मित्रांनो बॉलीवूड स्टार्स आपल्या फॅशन सेन्स मुळे चांगलेच चर्चेत असतात. ह्यामध्ये रणवीर सिंग, कार्तिक आर्यन, कंगना राणावत आणि सोनम कपूर आपल्या वेगळ्या स्टाईल स्टेटमेंट साठी ओळखले जातात. हे सर्वच स्टार्स खूप महागडे कपडे घालतात ज्यांची किंमत लाखांच्या घरात असते. पण आज आम्ही तुम्हाला काही अश्या स्टार्स बद्दल सांगणार आहोत ज्यांच्याकडे अमाप संपत्ती असून सुद्धा साधेपणाने राहणे पसंद करतात. हे अशे स्टार्स आहेत जे आपले कपडे लोकल मार्केट मधून खरेदी करतात. चला पाहुयात कोण आहेत हे स्टार्स.

८) सनी देओल – सनी देओल बॉलीवूड मध्ये खूप वर्षांपासून काम करत असून तो लाइमलाईट पासून दूरच असतो. बॉलीवूड पासून दूर असलेला सनी सध्या राजकारणात व्यस्त आहे. तो पंजाब च्या गुरुदासपूर इथून लोकसभा सदस्य आहे. सनीने दिग्दर्शित केलेला पल पल दिल के पास हा चित्रपट दिग्दर्शित केला असून त्यामध्ये त्याने त्याच्या मुलाला लाँच केले आहे. सनी करोडोंच्या संपत्ती चा मालक असून सुद्धा साधे जीवन जगून कपडेही साधेच घालतो.
७) इमरान हाशमी – बॉलीवूड चा सिरीयल किसर म्हणून ओळखला जाणारा इमरान हाश्मी सुद्धा साधे जगणे पसंद करतो. इमरान सुद्धा लाइमलाईट पासून दूरच असतो. तो त्याचे कपडे सुद्धा रस्त्यावरूनच खरेदी करतो.
६) राजकुमार राव – बॉलीवूड मध्ये सर्वात चांगल्या अभिनेत्यांपैकी एक असणारा राजकुमार राव उर्फ राज कुमार यादव ने आतापर्यंत अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. अत्यंत साध्या व्यक्तिमत्वाचा असलेला राजकुमार राव खऱ्या आयुष्यातही तितकाच साधा राहतो. एवढे यश मिळवून सुद्धा तो ब्रँडेड कपडे घालणे टाळतो आणि लोकल मार्केट मधूनच कपडे विकत घेतो.
५) नवाजुद्दीन सिद्दीकी – बॉलीवूड चा आघाडीचा कलाकार नवाजुद्दीन सिद्दीकीच्या करियर ला सध्या चार चांद लागलेले आहेत. तो ज्या चित्रपटाला हाथ लावेल त्याचे सोने होत आहे. प्रत्येक निर्माता त्याच्या सोबत काम करण्यास उत्सुक असून सुद्धा त्याचे पाय जमिनीवरच आहेत. नवाजुद्दीनला सुद्धा साधे राहणे आवडते आणि आजही तो कपडे लोकल मार्केट मधूनच खरेदी करतो.
४) सारा अली खान – केदारनाथ ह्या चित्रपटामधून बॉलीवूड मध्ये पदार्पण केलेली सैफ अली खान ची मुलगी सारा अली खान स्टारडम चांगलंच एन्जॉय करते आहे. अभिनयाची लहानपणापासूनच आवड असलेल्या साराला अभिनयाचं बाळकडू तिच्या आई वडिलांकडूनच मिळाले आहे. वडील नवाब असून सुद्धा सारा ला साधे राहणेच आवडते. हल्लीच सारा आणि तिची आई अमृता सिंग ला हैद्राबाद मध्ये लोकल मार्केट मध्ये शॉपिंग करताना पहिले होते. एका मुलाखतीत साराने ती लोकल मार्केट मधून कपडे खरेदी करते असे सांगितले होते.
३) सुशांतसिंग राजपूत – लहान पडद्यापासून आपल्या अभिनयाच्या करियर ची सुरवात केलेला सुशांत सिंग रजपूत आज मोठ्या पडद्यापर्यंत येऊन पोचला तरी त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. कपड्यांबाबत सुशांत म्हणतो कि कपडे कोणतेही असोत, जर कंफटेबल असाल तर तीच खरी फॅशन आहे.
२) काजोल – अजय देवगण ची पत्नी काजोल देवगण सध्या तिच्या येणाऱ्या तान्हाजी ह्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काजोल सुद्धा लाइमलाईट पासून खूप दूर असते आणि पार्टीज मधेही दिसून येत नाही. काजोल सुद्धा आपले कपडे लोकल मार्केट मधूनच खरेदी करते.
१) अक्षय कुमार – बॉलीवूड चा खिलाडी अक्षय कुमार चा प्रत्येक चित्रपट १०० कोटी पार करतो. करोडोंचा मालक असलेल्या अक्षय कुमारलासुद्धा साधी राहणीच आवडते. तो कुठलीच पार्टी अटेंड करत नाही आणि बाहेरचे खाणे सुद्धा टाळतो. बनियन ची जाहिरात करणारा अक्षय कपडेसुद्धा रस्त्यांवरूनच घेतो.
माहिती आवडली असल्यास लाईक करून शेयर करायला विसरू नका आणि आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.