बॉलिवूड चित्रपट जगात असे अनेक स्टार्स आहेत, जे त्यांच्या फिटनेसची उत्तम काळजी घेतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक सुपरस्टार्स आहेत जे या पूर्वी खूप लठ्ठ होते. पण सध्या ते बरेच बारीक झाले आहेत. आज आम्ही आपणास बॉलीवूडच्या अशा काही स्टार्सविषयी सांगणार आहोत ज्यांनी स्वतः मेहनत घेऊन शरीराचा लुक पूर्णपणे बदलला.

अदनान सामी :- अदनान सामी हे केवळ सर्वोत्कृष्ट गायकच नाही तर त्याकाळी ते त्यांच्या लठ्ठपणाबद्दल सुद्धा चर्चेत असायचे. अदनान सामीचे वजन सुमारे २०० किलो होते पण २००७ साली अदनान सामीचे एक नवीन रूप लोकांना पाहायला मिळाले ते म्हणजे स्लिम-ट्रिम झालेले अदनान सामी लोकांसमोर आले आणि सर्वांना चकित केले.गणेश आचार्य :- नृत्यदिग्दर्शक, दिग्दर्शक आणि अभिनेता गणेश आचार्य यांनी १६ महिन्यांत ८५ किलो वजन कमी केले. जेव्हा त्याने वजन कमी करण्याचा विचार केला तेव्हा गणेश यांचे वजन २०० किलो होते.
भूमि पेडणेकर :- ‘दम लगाके हैशा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी वजन कमी करण्याच्या प्रवास हा खूप प्रेरणादायी ठरला आहे. त्यांनी चार महिन्यांत २१ किलो वजन कमी केले. यासाठी त्यांनी कोणतेही डायटिंग कोर्स केले नसल्याचे हि त्यांनी सांगितले. त्यांनी फक्त तांदूळ, गव्हाची भाकरी आणि गोड खाणे थांबवले आणि जिममध्ये व्यायाम करणे सुरूच ठेवले. आज भूमिका खूप फिट आणि बारीक अश्या अभिनेत्री बनल्या आहेत आणि आपल्याला अनेक नव्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला भेटत असतात.अर्जुन कपूर :- बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अर्जुन कपूर खूपच लठ्ठ होते. पण त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि आपले शरीर फिट आणि स्लिम केले आहे.आमिर खान :- आमिर खानने खऱ्या आयुष्यात ही खूप मोठी बाजी मारलीआहे. त्यांचा अभिनय गुण सर्वाना परिचित आहेच पण ते स्वतः ला फिट राखण्याकरिता सुद्धा तेवढीच मेहनत घेतात. तुम्ही अमीर यांना “दंगल” चित्रपटात पाहिले असेलच, आमिर खानने ९७ किलो असलेले वजन काही महिन्यात त्यांनी ६० किलो वजन कमी केले आणि आमिर आता पुन्हा अगोदर सारखे दिसू लागले आहेत.सोनाक्षी सिन्हा :- प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा चित्रपटांत पदार्पण करण्यापूर्वी खूपच लठ्ठ होत्या. “दबंग” चित्रपटाच्या वेळी सोनाक्षी यांनी त्यांचे वजन खूपच कमी केले होते आणि आता पुन्हा वजन कमी करुन त्या स्वत: ला फिट राहत आहे आणि आता सोनाक्षी खूप बारीक झाल्या आहेत.जरीन खान :- जरीन खान या बॉलिवूड मधील नवोदित अभिनेत्री आहेत. त्यांनी आपला पहिला चित्रपट “वीर” सलमान खान सोबत केला आणि आज त्या यशाच्या शिखरावर आहेत. पण बॉलिवूड मध्ये यायच्या आधी त्या खूप लठ्ठ होत्या, त्यांनी काही दिवसापूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर स्वतःचा आधीचा फोटो पोस्ट केला होता पण प्रचंड मेहनत आणि इच्छेच्या जोरावर त्यांनी स्वतःचे रूप पूर्णपणे बदलून टाकले.परिणीती चोप्रा :- परिणीती चोप्रा ह्यानी जेव्हा बॉलिवूड इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली तेव्हा त्या खूपच लठ्ठ होत्या पण आज योग्य व्यायाम व परिश्रम केल्यामुळे परिणीती चोप्रा बर्‍याच सडपातळ बनल्या आहेत. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत परिणीती म्हणाल्या की आधी त्यांना ३८ नं साइजची जीन्स लगायची पण आता त्याना कंबर ३० नं साइज ची जीन्स नीट होते.करण जोहर :- दिग्दर्शक करण जोहर हे आधी खूप लठ्ठ होते पण योग्य आहार आणि प्रचंड मेहनतीमुळे ते खूप तंदुरुस्त आणि देखणे बनले आहे.
आलिया भट्ट :- “स्टुडंट ऑफ द इयर” मध्ये गोंडस, निरागस दिसणारी आलिया भट्ट अगोदर खूपच लठ्ठ होत्या. पण आता आलिया बारीक झाल्या आहेत आणि त्यांची चित्रपटातील मोहक अदा पाहून तुम्हाला समजेल की आलियाने यांनी स्वतः घडविण्यासाठी किती कष्ट केले आहेत.