बॉलीवूडमध्ये आपले करियर बनवण्यासाठी अनेक लोक दररोज आपले नशीब अजमावण्यासाठी मुंबईला येत असतात. पण खूपच कमी लोकांना यामध्ये सफलता मिळते. काही लोक असे असतात ज्यांना सुरवातीलाच यश मिळते आणि ते आपल्या करियरमध्ये सफल होतात. त्यानंतर त्यांच्या मागे चित्रपटांची रांग लागते. परंतु ते कलाकार आपले स्टारडम टिकवू शकत नाहीत. काही कलाकार असे आहेत ज्यांनी सफलता मिळवल्यानंतर देखील आपले करियर सोडून दुसऱ्या फिल्डमध्ये करियर बनवले.

ट्विंकल खन्ना :- ट्विंकल खन्नाने बॉलीवूडमध्ये बरसात या चित्रपटामधून डेब्यू केला होता. सुरवातीच्या काळामध्ये तर ट्विंकल खन्ना खूपच यशस्वी झाली होती. पण त्याचकाळामध्ये तिने लग्न केले आणि चित्रपटांपासून दूर निघून गेली. लग्नाच्या नंतर ट्विंकलने फिल्म इंडस्ट्री सोडून इंटीरियर डिजाइनर, लेखिका, न्यूज़पेपर कॉलमिस्ट बनली.सोहा अली खान :- सोहा अली खानने बॉलीवूडमध्ये जवळजवळ ९९ चित्रपटांमध्ये काम केले होते. पण ती जास्त सफलता मिळवू शकली नाही म्हणून ती चित्रपटांपासून दूर गेली. सध्या ती एक लेखिका बनली आहे.डिनो मोरिया :- डिनो मोरिया बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळाला होता. पण तो जास्त काही सफलता मिळवू शकला नाही. यानंतर तो हॉस्पिटैलिटी बिजनेसवर काम करू लागला. त्याचे मुंबईमध्ये अनेक रेस्टॉरंट्स आहेत.प्रीति जिंटा :- प्रीति जिंटा एके काळी बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सामील होती. पण काही काळानंतर तिचे फिल्मी करियर संपुष्टात आले. प्रीति जिंटाने स्वतःला चित्रपटांपासून दूर केले आणि तिने आयपीएलमध्ये क्रिकेट संघ विकत घेतला.कुमार गौरव :- कुमार गौरव एके काळी बॉलीवूडमधील सफल अभिनेता होता. पण त्याने काही काळानंतर ट्रैवलिंग बिजनेस सुरु केला. कुमार गौरव दिवंगत अभिनेता राजेंद्र कुमारचा मुलगा आहे. लव्ह स्टोरी या चित्रपटामध्ये तो अभिनय करताना पाहायला मिळाला होता. तेरी कसम, स्टार, नाम आणि कांटे सारख्या चित्रपटांमध्ये सुद्धा त्याने काम केले आहे.