बॉलीवूड मध्ये असे बरेच स्टार्स आहेत जे आपल्या सावत्र आईवर सुद्धा सख्या आईप्रमाणेच प्रेम करतात. कोणताही इव्हेंट असो किंवा पार्टी हे सेलिब्रिटीज आपले नाते सार्वजनिक करण्यास अजिबात कचरत नाहीत. चला पाहूया कोण आहेत हे सेलिब्रिटीज ज्यांचे आपल्या सावत्र आईशीही चांगले संबंध आहेत.

१) मान्यता दत्त – त्रिशाला दत्त :- हल्लीच संजय दत्त ची मुलगी त्रिशाला ने आपली सावत्र आई मान्यता दत्त सोबत एक फॅमिली फोटो सोशल मीडिया वर शेयर केला. ह्या फोटो मध्ये संजय आणि मान्यताचे दोन्ही मुलं दिसत आहेत. बरोबरच त्रिशाला सुद्धा खूप खुश दिसत आहे. ह्या फोटोकडे बघून तुम्हाला कळून येईलच त्रिशाला आणि मान्यता मध्ये खूप चांगली बॉंडींग आहे.२) सलमान खान – हेलन :– सलमान जेवढं प्रेम आपली सख्खी आई सलमाशी करतो तेवढाच तो त्याच्या सावत्र आई हेलनच्याही तितकाच जवळचा आहे. सलमान जेवढे प्रेम आपल्या आई ला देतो तितकेच तो तिच्या सावत्र आईला सुद्धा देतो. हल्लीच सलमान आणि हेलन चा एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये ते दोघे गमती जमती करताना दिसत आहेत.
३) सारा अली खान – करीना कपूर :- सारा अली खान ने खूप कमी कालावधीतच बॉलीवूड मध्ये आपला ठसा उमटवला आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंग ची मुलगी सारा अली खान चे संबंध करीना शी खूप चांगले आहेत. एका इंटरव्यू मध्ये सारा म्हणाली होती कि मी करीना ला बघून मोठी झाली आहे आणि तिच्या स्टाईल स्टेटमेंट ची दिवानी आहे. दोघं एकत्र पार्टी करताना सुद्धा एकत्र दिसल्या आहेत. दोघांमध्ये माय लेकी पेक्षा मैत्रिणी सारखं प्रेम आहे. सारा करीना ला आंटी नाही तर मैत्रिणीसारखं नावानेच हाक मारते.
४) शबाना आजमी – फरहान अख्तर :- शबाना आजमी आणि फरहान अख्तर चे नाते पण असेच काहीसे आहे. फरहान जावेद अख्तर आणि हनी इराणी चा मुलगा आहे पण दोघांचे संबंध आई आणि मुलाच्या सख्या नात्यापेक्षा कमी नाही आहेत.
५) शाहिद कपूर – सुप्रिया पाठक :- पंकज कपूर आणि नीलिमा अजीम चा मुलगा शाहिद कपूर आपली सावत्र आई सुप्रिया पाठक ह्यांच्या खूप जवळचा आहे. शाहिद आणि मीरा चे लग्न जुळवण्यासाठी सुप्रिया ह्यांनी खूप महत्वाची भूमिका निभावली होती. त्याच्या लग्नाच्या प्रत्येक विधीला त्यांची उपस्थिती होती.
६) किरण राव – जुनैद आणि इरा :- आमिर खान ची पहिली पत्नी रीना दत्ता ची दोन मुलं आहेत जुनैद आणि इरा. दोघंही मुलं आमिर ची दुसरी पत्नी किरण राव च्या खूप जवळ आहेत. जुनैद आणि इरा ला खूप वेळा किरण बरोबर पब्लिक इव्हेंट्स मध्ये स्पॉट केलं गेलं आहे.
आजही समाजात आपल्याला सावत्र आईशी जुळवून घेणं जमत नाही. सावत्र आई वाईट असते असा काहींचा समज असतो. पण प्रत्येक सावत्र आई वाईट असतेच असे नाही. एकमेकांना समजून घेतल्यास दोघांच्या नात्यातही गोडवा येऊ शकतो. लेख आवडला असल्यास लाईक करून शेयर करायला विसरू नका. तसेच तुमची प्रतिक्रिया कमेंट करून कळवा.