पंतप्रधानांच्या बॉडीगार्ड्सच्या ब्रिफकेस मध्ये काय असतं? जाणून घ्या रोचक माहिती !

3 Min Read

पंतप्रधानांची सुरक्षा देशातल्या सर्वात जबाबदार व्यक्तींनी बनलेली संस्था SPG (विशेष सुरक्षा दल) “स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप” च्या हातात असते. लोकसभेच्या निवडुकीदरम्यान किंवा राज्यांच्या निवडणुकीत सुद्धा! तुम्ही पाहिलं असेल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या बरोबर त्यांचे बॉडीगार्ड्स त्यांच्या सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत असतात आणि त्यांच्याकडे एक ब्रिफकेस सुद्धा असते. तुम्हाला माहिती आहे ह्या ब्रिफकेस मध्ये काय असते? चला मग ह्या लेखात वाचूया नेमके काय असते त्यांच्या ब्रिफकेस मध्ये.

भारताच्या प्रधानमंत्रीची सुरक्षा “स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप” चे कमांडोज करतात. ह्या पूर्वी हयात असलेल्या सर्वच माजी पंतप्रधानांना ही सुरक्षा मिळत होती. पण आता माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह ह्यांची सुद्धा सुरक्षा काढून Z + करण्यात आली आहे. हे सर्वच कमांडो खूप चपळ असतात तसेच त्यांच्यासोबत आधुनिक हत्यारे ही असतात. काही सेकंदातच ते आपली पोजिशन घेतात.SPG ची स्थापना १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांच्या हत्येनंतर करण्यात आली. जेव्हा राजीव गांधी ह्यांची हत्या झाली तेव्हा SPG ला पुन्हा नव्याने तयार करण्यात आले. प्रधानमंत्री जिथून जिथून मार्ग काढतात, तिथे गल्लो गल्ली SPG चे निशाणेबाज कमांडोज तैनात असतात. SPG चे हे कमांडोज FNF- २००० असॉल्ट रायफल, ऑटोमॅटिक गन आणि १७-एम सारखी खतरनाक पिस्तूल अश्या आधुनिक शस्त्रांनी युक्त असतात. पण तुम्हाला माहितीये, पंतप्रधान ही सुरक्षा घेण्यास नकार ही देऊ शकतात.
तुम्ही पाहिलं असेल, ह्या कमांडोज च्या हातामध्ये एक ब्रिफकेस सुद्धा असते. तुम्ही पहिली नसल्यास २६ जानेवारी च्या परेड मध्ये तुम्ही ह्याची झलक पाहू शकता. लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल पंतप्रधानांच्या बॉडीगार्ड्स च्या हातात ही ब्रिफकेस दिसून येते. पण ह्या ब्रिफकेस मध्ये नक्की काय असतं? हा प्रश्न ही तुम्हाला पडला असेल.ही ब्रिफकेस वास्तविकतेमध्ये खूप पातळ असते आणि प्रधानमंत्रीच्या काही फूट लांबच असते. खरं तर ही ब्रिफकेस पोर्टेबल बुलेटप्रूफ शिल्ड असते जी हल्ला झाल्यानंतर उघडली जाते ज्यामुळे NIG लेवल ३ सुरक्षा प्रदान होते. बॉडीगार्ड्स ना काही संशयास्पद हालचाली झालेल्या दिसल्यास ते पंतप्रधानांना सुरक्षित करण्यासाठी ही शिल्ड खालच्या बाजूला धक्का देऊन उघडतात आणि ह्याचा ढाल म्हणून काम करतात. ह्या ब्रिफकेस मध्ये एक गुप्त खिसा असतो जिथे पिस्तूल ठेवली जाते.

SPG सोबत एक CAT “काउंटर असौल्ट टीम” सुद्धा असते. ह्या टीम सोबत एफ.एन. – २०००, पी – ९०, ग्लोक १७, ग्लोक -१९ आणि एफ,एन, ५ सारख्या शस्त्रांना वापरण्याची कला त्यांच्यात असते. ह्या टीम ला अतिशय कठीण प्रशिक्षणाला सामोरे जाऊन प्रशिक्षित केले जाते. आणि ह्याची खासियत अशी आहे कि कोणत्याही हल्ल्यावेळी ही टीम एकदम जलद कार्यवाही करते.SPG कॅबिनेट सचिवालयाच्या अंडर येते आणि ह्याचे महानिदेशक भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असतात. SPG च्या कमांडोज ची निवड “केंद्रीय सशस्त्र पोलीस बल” आणि “रेल्वे सुरक्षा बल” च्या जवानांमधून केली जाते. ह्याची कमान आय पी एस किंवा आर पी एफ च्या अधिकाऱ्यांकडे असते. SPG नेहमी विशिष्ट् व्यक्तींना सुरक्षा पोचवण्याचे काम करते. माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेयर करायला विसरू नका. तसेच तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *