कॉल डिटेल्स मधून झाला खुलासा, दिशा सालियनच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती आणि सुशांत दरम्यान झाली…!

2 Min Read

सुशांत सिंह राजपूत सु*सा*इ*ड प्रकरणामध्ये अभिनेत्याच्या वडिलांद्वारे एफआईआर केल्यानंतर प्रकरणामध्ये प्रत्येक दिवशी नवीन खुलासे होत आहेत. ईडीने नुकतेच सुशांत सिंह राजपूतच्या बँक अकाऊंटमधून पैसे काढण्याबद्दल रिया चक्रवर्तीला नोटीस जारी केली आहे. पण ती अजूनपर्यंत ईडी समोर हजर झाली नाही. तर आता ईडीने रिया चक्रवर्तीच्या सीएची चौकशी केली आहे, ज्यामध्ये महत्वाचे खुलासे झाल्याचे बोलले जात आहे. या चौकशीमध्ये रिया चक्रवर्तीने दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजे ८ जून पासून सुशांतसोबत बातचीत केली नव्हती.सुशांत सिंह राजपूतच्या कॉल डिटेलनुसार दोघांमध्ये जवळ जवळ १ आठवड्यापर्यंत बातचीत झाली नव्हती. एका न्यूज वेबसाईट नुसार सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती दरम्यान ८ जून नंतर कोणतही बातचीत किंवा मॅसेज एक्सचेंज झाला नाही आणि कॉलवर देखील बोलणे झाले नाही. रेकॉर्ड्स मधून खुलासा झाला आहे आपली एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूनंतर सुशांत रियाच्या संपर्कामध्ये नव्हता.सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी पटनाच्या राजीव नगर ठाण्यामध्ये अभिनेत्याच्या मृत्यू प्रकरणामध्ये रिया चक्रवर्ती तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती आई संध्या चक्रवर्ती आणि भाऊ शौविक चक्रवर्ती सहित एकूण ६ जणांविरुद्ध एफआईआर दाखल केली आहे. ज्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी बिहार पोलिसांची एक टीम मुंबई पोहोचली होती. पण आता जेव्हा प्रकरण सीबीआईकडे सोपविण्यात आले आहे तेव्हा बिहार पोलिसांची टीम पटना परत गेली आहे.
तर बिहार पोलिसांच्या टीमचे आईपीएस ऑफिसर अजून देखील बीएमसी द्वारे मुंबईमध्ये क्वारंटाइन आहेत. सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी मुंबई स्थित आपल्या अपार्टमेंटमध्ये ग*ळ*फा*स घेऊन आ*त्म*ह*त्या केली होती. ज्यानंतर मुंबईचे बांद्रा पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. पण मुंबई पोलिसांच्या तपासावर नाराज होऊन नुकतेच सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *