सर्वसाधारण जर एखाद्या व्यक्तीने ते घर घेतलं तर त्याला तिथे राहण्यासाठी पैसे मोजावे लागतात परंतु इटली मधील कैडेला या गावामध्ये घर घेतल्यानंतर तुम्हाला राहण्यासाठी पैसे भेटतात… हो हे खरंय इटलीच्या या गावांमध्ये जो कोणी माणूस घर घ्यायला इच्छुक आहे त्यांना या ठिकाणी मोफत घर उपलब्ध करून दिले जाते तसेच त्यासोबत त्यांना पैसेही दिले जातात. ही ऑफर या गावातील मुखियाने सुरू केलेली आहे आणि या ऑफरची घोषणा करत असताना त्यांनी सांगितले की या गावांमध्ये जो कोणी राहील त्याला फ्री मध्ये घर दिले जाईल आणि त्यासोबतच १,६३,७४९/- रुपये पण दिले जातील.गाव खूप सुंदर आहे

इटली या देशांमधील हे गाव खूप सुंदर आहे आणि या गावामध्ये खूप सुंदर घरं बनवली जातात त्यासोबतच या घरांच्या आजूबाजूला खूप सारी हिरवळ आहे आणि सोबतच शेतीही आहे.

पूर्ण जगभरातील लोकांसाठी ही आहे ऑफर

जगामध्ये लोकांना रहायला आणण्यासाठी ही ऑफर सुरू केली गेली आहे. यामध्ये जगभरातील कोणतेही लोक येथे घर घेऊ शकतात. ज्यावेळी ही वापर सुरू करण्यात आली त्यावेळी याचा लाभ फक्त इटलीतील लोक घेऊ शकत होते पण आता या गोष्टीचा फायदा जगभरातील सगळे लोक घेऊ शकतात म्हणजे तुम्ही जर विचार करत असाल तर तुम्हीही या गावात घर घेऊ शकता.

ऑफर मध्ये घर घेण्यासाठी तुम्हाला काही अटी आहेत ते आहेत खालील प्रमाणे –तुम्ही तर विचार करत असाल की आपण येथे घर घेऊ, पैसे घेऊ, आपली संपत्ती बनवू आणि ज्या वेळी पाहिजे त्यावेळी येऊन राहू तर ते तसं नाहीये कारण या ऑफर सोबत काही अटीही आहेत त्यानुसार जर तुम्ही तर घर घेतलं तर तुम्हाला इथेच राहावे लागेल आणि सोबतच येथेच तुम्हाला दुकान हॉटेल वगैरे अशा प्रकारचे व्यवसाय तुम्ही याच ठिकाणी करणे गरजेचे आहे. ही ऑफर साधारणता तरुण वर्गासाठी आहे आणि ज्यांची यांच्या कुटुंबाची कमाई कमीत कमी सात हजार 500 युरो प्रतिवर्ष हवी.

आता ऐका का सुरू केली ही ऑफर –खरंतर या गावातील संख्या दिवसेंदिवस खूप कमी होत चालली होती त्यामुळे त्या गावातील मुखियाने ही ऑफर काढली. कारण त्याच्या म्हणण्यानुसार हे जर असेच घडत राहिले तर एक दिवस गाव पूर्णपणे रिकामे होईल आणि तिथे कोणीच राहिला येणार नाही त्याच्यामुळे ही ऑफर काढण्यात आली.

हे आहे मूळ कारण –२५ वर्ष्यापूर्वी या गावची लोकसंख्या ८००० इतकी होती परंतु आता ती २५०० वर आली आहे। कारण तिथे तरुण वर्गासाठी नोकरीच्या सोयी नाहीत. यामुळे गावातील लोकसंख्या कमी होत चालली आहे आणि राहिलेले लोक जास्त करून अधिक वयाचे आहेत.