आजकाल नैसर्गिक रित्या बाळाला जन्माला येण्याचे प्रमाण कमी होऊन सिजरींग चा पर्याय वापरून जन्म देण्याचे प्रमाण वाढले आहे. २०१० पर्यंत हे प्रमाण भारतात फक्त ८.५ टक्केच होते जे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या शिफारसीनुसार १५ टक्क्यांपेक्षा कमी होते. पण गेल्या दशकभरात काही राज्यांमध्ये ह्याचे प्रमाण खूप जास्तच वाढले असून केरळ आणि तामिळनाडू मध्ये ह्याचे आकडे अनुक्रमे ४१ टक्के आणि ५८ टक्के असे सांगतात. मुंबईतल्या सरकारी आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्स ह्या दोन्ही मध्ये ह्याचे प्रमाण वाढले असून प्रायव्हेट हॉस्पिटल्स सिजरींग करण्यास जास्तच उत्सुक असतात.

बाळाला ह्या जगात जन्माला येण्यासाठी म्हणजेच त्याची डिलिव्हरी सुखरूप होण्यासाठी दोन मार्गांचा वापर होतो त्यातली पहिली म्हणजे नैसर्गिक रित्या योनीतुन बाळाला बाहेर काढणे आणि दुसरा मार्ग म्हणजे सिजरींग. सिजरींग बाबत तुमचे अनेक प्रश्न असतील. सिजरींग म्हणजे नक्की काय? का करतात सिजरींग? त्याचा फायदा होतो कि नुकसान? सिजरींग करणं योग्य कि अयोग्य? जाणून घेऊया ह्या लेखा मध्ये.सिजरींग म्हणजे काय?
आईला नैसर्गिक रित्या बाळाला जन्म देणे काही वैद्यकीय कारणामुळे शक्य नसल्यास वापरात येणारी दुसरी पद्धत म्हणजे सिजरींग. सिजरींग करताना आई बाळाला योनीतुन जन्म न देता सर्जरी च्या मार्गाने बाळाला जन्म देते. ही प्रक्रिया आई आणि बाळाच्या स्वास्थ्यासाठी नैसर्गिक प्रक्रिये पेक्षा चांगली समजली जाते. ह्याचे कारण म्हणजे योनीतुन जन्म घेताना बाळाला आणि आईला असणारा जीवाचा धोका. पण सर्वांसाठीच ही प्रक्रिया चांगली ठरते? त्याचे उत्तर नाही असे आहे.

का करतात सिजरींग?
डॉक्टर काही मेडिकल कंडिशन्स मधेच सिजरींग करण्याचा सल्ला देतात जसे कि आईला उच्च रक्तदाबाचा विकार असल्यास किंवा डायबिटीज असल्यास. जुळे जन्माला येणार असल्यास, आईला कसले इन्फेक्शन्स असल्यास जे बाळाला ही नंतर होण्याचा धोका असतो. बाळाचा आकार मोठा असल्यास किंवा डिलिव्हरी च्या वेळीस डोके खालच्या बाजूला नसल्यास डॉक्टर सिजरींग चा उपाय सुचवू शकतात. कारण तसे न केल्यास आई आणि बाळ दोघांच्या जीवाला धोका पोचू शकतो.काय आहेत सिजरींग चे फायदे आणि नुकसान?
सिजरींग फक्त काही मेडिकल कंडिशन्स असल्यासच करता येते असे नाही. आई ची इच्छा असल्यास सिजरींग करून सुद्धा बाळाला जन्म देता येतो. पण त्यामध्ये काही फायदे आहेत तसे नुकसान ही आहे.
सिजरींग चे फायदे :-
१) सिजरींग प्लान करून बाळाच्या जन्माची शुभ तारीख ठरवता येते.
२) ऍनेस्थेशिया दिल्यामुळे वेदना होत नाहीत ज्या नैसर्गिक रित्या जन्म देताना होतात.
३) मेडिकल कंडिशन असल्यास दुसरा सर्वात चांगला आणि सुरक्षित उपाय म्हणून सिजरींग कडे पहिले जाते.
४) योनीचा संबंध येत नसल्याने त्यास इजा पोहोचत नाही.
५) जन्म दिल्या नंतर अति रक्तस्त्राव होत नाही.
६) मुत्राशयाचे नियंत्रण नीट राहते आणि लिकेज होत नाही.सिजरींग केल्याने होऊ शकणारे नुकसान :-
१) सिजरींग केल्याने पडणाऱ्या टाक्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो.
२) हार्ट अटॅक येण्याची शक्यता.
३) पुढच्या वेळी गर्भधारण करताना समस्या येऊ शकतात.
४) पुढच्या वेळी गर्भपात होण्याची आणि मृत बालक जन्माला येण्याची शक्यता.
५) जास्त खर्चिक आणि लवकर डिस्चार्ज मिळत नाही.
६) सिजरींग नंतर हालचाल करताना वेदना जाणवू शकतात व बाळाला दूध पाजताना समस्या येऊ शकते.
त्यामुळे सिजरींग करणे योग्य किंवा अयोग्य ह्याचे नेमके उत्तर देणे त्याच्या वैद्यकीय परिस्थितीवर अवलंबून असून केवळ वेदनांपासून सुटका व्हावी म्हणून केले गेल्यास ते अयोग्य ठरेल. आई आणि बाळ दोघंही स्वस्थ असल्यास नैसर्गिक मार्गाने योनीतुन बाळाला जन्म देणे सुरक्षित ठरते. माहिती आवडल्यास शेयर करायला विसरू नका.