कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या द कपिल शर्मा शोच्या नवीन सीजनमधून पुनरागमन करत आहे. असे म्हंटले जात आहे कि कपिलने आपला लुकदेखील खूप चेंज केला आहे. नुकतेच त्याचे ट्रांसफॉर्मेशन समोर आले आहे. तसे तर कपिल शर्मा १५ वर्षापासून मनोरंजन जगतामध्ये सक्रीय आहे आणि त्याच्या प्रॉपर्टीबद्दल जाणून घेतले तर तुमचे देखील डोके भणभणेल. मुंबईमध्ये त्याचे आलिशान अपार्टमेंट आणि लक्झरी कार्स देखील आहेत. माहितीनुसार तो एका एपिसोडसाठी जवळ-जवळ ७०-८० लाख रुपये फीस घेतो. आज आपण कॉमेडीयन कपिल शर्माच्या प्रॉपर्टीबद्दल जाणून घेणार आहोत.

एका मध्यमवर्गीय कुटुंबातील कपिल शर्माचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याने आपल्या करियरमध्ये अनेक रिजेक्शन सहन केले आहेत आणि पैशांची तंगी देखील बघितली. कपिल शर्माचे खरे नाव शमशेर सिंह आहे. पंजाबमध्ये जन्मलेल्या कपिलने जेव्हा लाफ्टर चॅलेंज ३ जिंकला होता तेव्हा तो अचानक चर्चेमध्ये आला होता.

कदाचित खूपच कमी लोकांना माहिती आहे कि लाफ्टर चॅलेंज ३ जिंकल्यानंतर त्याला १० लाख रुपये प्राईस मनी भेटले होते. त्यावेळी त्याने त्याच्या बहिणीचे लग्न केले होते. कपिल शर्मा जवळ जवळ ९ लाफ्टर चॅलेंजचा विनर राहिला आहे. त्याच्या लाइफस्टाइलबद्दल बोलायचे झाले तर तो एक लक्झरी आणि रॉयल लाइफस्टाइल जगणे पसंद करतो. कपिलजवळ २७६ करोड रुपयांची संपत्ती आहे. कपिल शर्मा एका महिन्यामध्ये जवळ जवळ ३ करोड रुपयांची कमाई करतो आणि त्याचे वार्षिक उत्पन्न ३२ करोड रुपये इतके आहे.

तो एका एपिसोडसाठी जवळ जवळ ७०-८० लाख रुपये चार्ज करतो, तो ब्रँड एंडोर्समेंटमधूनही करोडो रुपयांची कमाई करतो. कपिल शर्माचे मुंबईच्या पॉश एरियामध्ये आलीशान अपार्टमेंट आहे ज्याची किंमत जवळ जवळ ८ करोड रुपये इतकी सांगितली जाते. याशिवाय त्याची इतर काही स्टेट्समध्ये देखील प्रॉपर्टीज आहेत. त्याने डिसेंबर २०१८ मध्ये त्याची लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड गिन्नी चतरथसोबत लग्न केले होते. या कपलला आता एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
कपिल शर्माला महागड्या गाड्यांची देखील खूप आवड आहे. त्याच्याजवळ रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ, इव्होक एसडी ४, व्होल्वो एक्ससी ९० सारख्या लक्झरी कार्स आहेत. तर त्याच्याजवळ एक लक्झरी कस्टमाइज व्हॅनिटी व्हॅन देखील आहे जी एखाद्या आलिशान अपार्टमेंट इतकीच पॉश आहे.