दबंग 3 हा चित्रपट 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी तर बहुतेक जणांनी तर ऍडव्हान्स तिकीट बुकिंग करून ठेवले होते. चित्रपट प्रेक्षकांचा भेटीला येण्यापूर्वीच हॉउसफ़ुल्ल होणार असं भासत होतं. तर मग चला पाहूया या सुपरहिट चित्रपटातील किती मानधन घेतले आहे.

किच्चा सुदीप यांनी घेतले 12 करोड़ रुपये – दक्षिण इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेता, सुदीपने दबंग 3 मध्ये दमदार नकारात्मक भूमिका साकारली असून, यामध्ये दबंग 3 साठी 12 कोटी रुपये घेतले आहेत. आणि या मानधनाच्या रक्कमेवरून तो सलमान खानला नक्कीचा टक्कर देतो.
सोनाक्षी सिन्हाने आकारले 7 करोड़ रुपये – सोनाक्षी सिन्हा ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. राजोच्या नावावर प्रत्येक दबंगमध्ये ती आपली व्यक्तिरेखा साकारत असून यावेळेस देखील तिने चमकदार अभिनय केला आहे. दबंग 3 साठी तिने 7 कोटी रुपये घेतले आहेत.
वरीना हुसैन ने 40 लाख रुपये मानधन घेतले – गेल्या वर्षी लवरात्री या चित्रपटाद्वारे आपल्या भेटीला आलेल्या वरीना हुसेन दबंग 3 मधील मुन्ना बदनाम या गाण्यावर आयटम गर्ल म्हणून दिसली आणि सर्व प्रेक्षकांचे मनोरंजन केले. याकरिता तिने 40 लाख इतकी फी घेतली आहे.
माही गिल ने घेतले 1 करोड़ रुपये – दबंग 3 मध्ये माही गिल यांनी अरबाज खान म्हणजे चुलबुल पांडे यांचा पत्नीचे पात्र रंगवले आहे. या पात्राकरता तिने 1 करोड इतकी रक्कम मानधन म्हणून स्वीकारली आहे.
निकितन धीर ने 80 लाख रुपये इतके मानधन स्वीकारले – अनेक नकारात्मक, व्हिलनचा भूमिका साकारणारा निकितन धीर दबंग 3 मध्ये देखील नकारात्मक भूमिका साकारली आहे. आणि याकरिता 80 लाख इतकी रक्कम त्यांनी स्वीकारली आहे.
सलमान खान ने 70 करोड़ रुपये आकारले – बॉलिवूडची शान असलेला भाईजान दबंग 3 मध्ये चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसला आणि सलमान खानमुळे चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतो, म्हणूनच या चित्रपटात त्याने सर्वाधिक 70 कोटी शुल्क आकारले आहे.