भले हि आजची पिढी दूरदर्शनवरील रामायणचा अनुभव नाही घेऊ शकली ज्याचे प्रसारण सुरु झाले कि सर्वजण टीव्हीसमोर बसत असत, इतकेच नाही तर रामायण सिरीयल प्रसारित होण्याच्या दरम्यान रस्त्यावर एकही मनुष्य दिसत नव्हता. रामायणला आता ३३ वर्षे उलटली आहेत पण आता असे वाटू लागले आहे कि इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे कारण सध्या दूरदर्शनवर रामायण पुन्हा प्रसारित केले जाऊ लागले आहे आणि बाहेर कोणतीही व्यक्ती दिसून येत नाही आहे, पण यावेळी कारण थोडे वेगळे आहे कोरोना व्हायरस. ज्यामध्ये २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे सर्व लोक घरी बसून पुन्हा एकदा रामायण संपूर्ण परिवारासोबत पाहत आहेत.

३३ वर्षाच्या प्रदीर्घ काळापासून बरेच काही बदलले आहे, रामायणची संस्मरणीय भूमिका आजसुद्धा लोकांच्या मनामध्ये जशीच्या तशी आहे, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो कि यामधील काही कलाकार या जगामध्ये नाहीत. यामधील एक आहेत दारा सिंह.रामायणमध्ये हनुमानाची भूमिका साकारणारे दारा सिंह त्यांच्या काळातील जगप्रसिद्ध फ्री स्टाईल कुस्तीपटू राहिले आहेत. त्यांनी १९५९ मध्ये माजी विश्वविजेत्या जार्ज गारडियान्काचा पराभव करून राष्ट्रकुलची जागतिक स्पर्धा जिंकली होती. १९६८ मध्ये ते जागतिक विजेता लाऊ थेजला हरवून फ्रीस्टाईल कुस्तीमधील विश्वविजेता झाले. त्यांनी ५५ व्या वर्षापर्यंत पैलवानकि केली आणि एकूण ५०० स्पर्धेमध्ये ते विजयी झाले. १९८३ मध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील अंतिम विजय संपादित केला आणि कुस्तीतून सन्मानपूर्वक निवृत्ती घेतली.१९६० मध्ये पूर्ण भारतामध्ये ते कुस्तीमध्ये लोकप्रिय होते. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध अदाकारा मुमताज सोबत हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. दारा सिंहने अनेक चित्रपटांमध्ये अभिनया शिवाय दिग्दर्शन आणि लेखनही केले. त्यांना टीव्ही सिरीयल रामायणमध्ये हनुमानच्या भूमिकेमधून खूप लोकप्रियता मिळाली. खूपच कमी लोकांना माहिती आहे त्याकाळामध्ये दारा सिंहने रामायणसाठी खूपच मोठी रक्कम वसूल केली होती.रामानंद सागरच्या रामायणसाठी दारा सिंह सर्वात फिट कलाकार होते. त्यांनी आपली भूमिका अतिशय योग्यरित्या साकारली होती. दारा सिंहचे गुण आणि व्यक्तिमत्त्व या भूमिकेला चांगली सूट करत होती. त्यांनी भल्या भल्या स्टार्सला फेल केले होते.दारा सिंहला त्यावेळी जे मानधन मिळत होते ते एखाद्या बड्या अभिनेत्यापेक्षा काही कमी नव्हते. भगवान हनुमानाच्या भूमिकेसाठी दारा सिंहला ३० ते ३३ लाख रुपये इतके मानधन मिळत होते. जे आताच्या काळामध्ये जवळजवळ १०-२० करोड रुपये इतके आहे. छोट्या पडद्यावर राम-सिता च्या जीवनाविषयीची हि पहिलीच सिरीयल होती. ज्याला रामानंद सागर खास फॅमिली टाईममध्ये घेऊन आले होते.