प्रसिद्ध अभिनेता शिवाजी साटम आणि टीव्ही जगतातील एसीपी प्रद्युमन २१ एप्रिल म्हणजेच आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. शिवाजीने आपल्या अभिनय करियरमध्ये वास्त व’, गुलाम-ए-मुस्तवफा, सूर्यवंशम, नायक अशा ३५ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण टीव्ही सिरीयल सीआईडी मधील एसीपी प्रद्युमन या भूमिकेमुळे ते घराघरामध्ये ओळखले जातात. तसे तर शिवाजी साटमने रामानंद सागरच्या रामायणमध्ये काम केलेले नाही पण त्यांचे या शोशी खास कनेक्शन आहे.

१९५० मध्ये मुंबईमध्ये जन्मलेल्या अभिनेता शिवाजी अभिनयाच्या दुनियेमध्ये येण्यापूर्वी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये कॅशियर होते. बँकेची नोकरी खूप चांगली चालू होती पण एक इंटर बँक स्टेज स्पर्धेमुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. फिजिक्सरमधून ग्रॅज्युएट आणि बिझिनेस अॅकडमिनिस्ट्रेशन मधील डिप्लोमा मिळवणाऱ्या शिवाजी यांना अभिनयाची खूपच आवड होती, पण त्यांना हे माहित नव्हते कि एक दिवस अभिनय त्यांच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग होईल.रामानंद सागरच्या रामायणमधील राजा दशरथची भूमिका बाळ धुरी यांनी साकारली होती. अभिनेता बाळ धुरी मराठी थियेटरमधील दिग्गज अभिनेता होते. शिवाजी साटमच्या अभिनय करियरला लॉन्च करण्याचे श्रेय बाळ धुरी यांनाच जाते. जेव्हा शिवाजीने इंटर-बँक स्टेलज स्पर्धेमध्ये भाग घेतला होता तेव्हा त्यांचा अभिनय पाहून सर्वच दंग झाले होते. शिवाजीला थियेटरशी खूप लगाव होता. याचदरम्यान बाळ धुरी यांची नजर शिवाजीवर पडली होती.बाळ धुरीने शिवाजी साटमला पहिला ब्रेक दिला होता. शिवाजी म्युजीकल ड्रामा संगीत वरद चा भाग बनले आणि इथूनच त्यांच्या अभिनय करियरला सुरवात झाली. १९८८ मध्ये शिवाजीने पहिला हिंदी चित्रपट पेस्टोनजी मध्ये काम केले. ते या चित्रपटामध्ये डॉक्टारच्या भूमिकेमध्ये होते. १९९१ मध्ये १०० डेजमध्ये ते पोलीस इन्स्पेक्टर बनले होते. शिवाजी साटम हिंदीशिवाय मराठी आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये देखील पाहायला मिळाले आहेत.१९९८ मध्ये शिवाजी साटमने टीव्ही सिरीज सीआईडी मध्ये काम करायला सुरु केले आणि त्यांनी छोट्या पडद्यावर प्रसिद्धी, पैसा आणि नाव सर्वकाही कमवले. हा शो भारतीय टीव्हीच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ चालणारा शो आहे. २०१८ पर्यंत या शोचे १५४७ एपिसोड टेलिकास्टक झाले होते. शिवाजी साटमला एसीपी प्रद्युमनच्या भूमिकेसाठी अनेक अवॉर्ड्स देखील मिळाले.