बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या अपकमिंग प्रोजेक्टमध्ये बीजी आहे. नुकतेच तिची एका फ्लाईटदरम्यान भेट उर्वशी रौतेलासोबत झाली. दोघींची भेट दुबईहून मुंबईला परत येताना झाली. या भेटीचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

हे फोटो दीपिकाच्या एका इंस्टाग्राम फॅन पेजने शेयर केले आहेत. फोटोमध्ये दीपिकाच्या गालावर उर्वशी कीस करताना पाहायला मिळत आहे. तर दीपिका स्मित हास्य देताना पाहायला मिळत आहे. दीपिका आणि उर्वशी ब्लॅक आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.

फ्लाईटमधून उतरल्यानंतर दीपिकाला ब्लॅक ड्रेससोबत डेनिम जॅकेटमध्ये स्पॉट केले गेले. यादरम्यान तिने गुरुवारी दुपारी इंस्टाग्रामवर आपल्या आगामी पठाण चित्रपटाबद्दल अपडेट दिली. एक फोटो शेयर करत तिने सांगितले कि चित्रपटाच्या डबिंगचे काम सुरु आहे. या पोस्टसोबत तिने कॅप्शनमध्ये सांगितले कार्य प्रगतीपथावर आहे.

पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. हा चित्रपट जानेवारी २०२३ मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या अगोदर सिद्धार्थ आनंदने ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफसोबत वॉर चित्रपटावर काम केले आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट झाला होता. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दीपिकाजवळ अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. ती प्रभाससोबत एका प्रोजेक्टवर काम करत आहे.
यासोबत ती अमिताभ बच्चनसोबत द इंटर्न आणि ऋतिक रोशनसोबत फायटरमध्ये देखील दिसणार आहे. असे म्हंटले जात आहे कि शाहरुखच्या जवान मध्ये देखील ती स्पेशल भूमिकेमध्ये दिसणार आहे. माहितीनुसार नुकतेच रिलीज झालेल्या रणबीर कपूर स्टारर ब्रह्मास्त्र पार्ट १शिवा च्या दुसऱ्या भागामध्ये देखील ती मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे.