बाहुबली फेम प्रभास एक मोठ्या घोषणेसोबत पॅन इंडिया स्टार म्हणून समोर आला आहे. त्याचा स्टारडम केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाहायला मिळतो. आता प्रभासच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. वैजयंती मूवीजने आपल्या आगामी चित्रपटासाठी प्रभास आणि दीपिका पादुकोणच्या जोडीची घोषणा केली आहे. याचबरोबर हे तर निश्चित आहे कि हा चित्रपट भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वात मोठा चित्रपट ठरेल. हेच कारण आहे #Prabhas21 सध्या ट्विटरवर ट्रेंड करत आहे.हि घोषणा एक सर्वोत्तम कास्टिंगचा नमुना आहे. एक असा प्रोजेक्ट वैजयंती मूवीज, निर्माता सी अश्विनी दत्त, सह-निर्माता स्वप्ना आणि प्रियंका दत्त आणि निर्देशक अश्विन नाग द्वारा संभव केला गेला आहे. आपली उत्सुकता सांगताना आणि आगामी योजनेबद्दल बोलताना निर्देशक नाग अश्विन म्हणाले कि, मी दिपिकीला हि भूमिका साकारताना पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहे. हे काही असे आहे ज्याला याआधी कोणत्याही मेनस्ट्रीम लीडने केले नाही, हे सर्वांसाठी एक मोठे सरप्राइज असेल. दीपिका आणि प्रभासची जोडी चित्रपटाच्या हाइलाइट्समधील एक असेल आणि त्यांच्यामधील स्टोरी, मला वाटते कि येणाऱ्या काही वर्षांपर्यंत दर्शकांच्या मनामध्ये ताजी राहील.
वैजयंती मूवीजचे प्रोड्यूसर आणि फाउंडर श्री सी अश्विनी दत्तने म्हंटले कि हा चित्रपट आमच्यासाठी भारतीय चित्रपट इतिहासामध्ये स्थान निश्चित करण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. हि भारतीय दर्शकांना रोमांचित करण्यासाठी एक अविश्वसनीय संधी आहे, ज्याला पहिले कधी पाहिले गेलेले नाही आणि यामध्ये आश्चर्यकारक सिनेमॅटिक प्रतिभा एकत्र येणार आहे.हा चित्रपट सायन्स आणि फिक्शन शैलीशी संबंधी आहे आणि या प्रोडक्शनमध्ये बनणाऱ्या सर्वात रोमांचक चित्रपटांपैकी एक होण्याची अपेक्षा आहे. अनुभवी निर्माता अश्विनी दत्त द्वारे स्थापित वैजयंती मूवीज तेलगु राज्यांमध्ये एक प्रसिद्ध नाव आहे. प्रोडक्शन हाउसने भव्य चित्रपटासाठी खूप प्रशंसा आणि प्रतिष्ठा मिळवली आहे आणि नेहमी एक प्रचंड कॅनव्हासवर चित्रपटाची निर्मिती करत आले आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.