बॉलीवूड सेलेब्स सोबत नेहमीच त्यांचे बॉडीगार्ड पाहायला मिळत असतात. सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा, अमिताभ बच्चनचा बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे, शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी सिंह आहेत. अनेक बॉलीवूड सेलेब्ससोबत तुम्ही त्यांच्या बॉडीगार्डला पाहिले असेल. पण तुम्हाला माहिती आहे का कि दीपिक पादुकोनचा पर्सनल बॉडीगार्ड कोण आहे आणि या कामासाठी तो किती पैसे घेतो.बॉडीगार्ड्स कलाकारांच्या लाईफचा एम महत्वाचा भाग आहेत. बॉलीवूड कलाकारांची फॅन फॉलोइंग इतकी जास्त असते कि प्रत्येकजण त्यांची झलक जवळून पाहू इच्छितो. अशामध्ये अनेक वेळा लोक त्यांना टच देखील करतात तर कधी धक्काबुक्की करतात. अशामध्ये बॉडीगार्ड त्यांची मदत करतात आणि त्यांना या सर्व गोष्टींपासून वाचवतात. बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोनच्या पर्सनल बॉडीगार्डचे नाव जलाल आहे. जलाल अनेक वर्षांपासून दीपिकाचा पसर्नल बॉडीगार्ड आहे. पब्लिक प्लेसमध्ये जलाल नेहमी दीपिकासोबत असतो.जलालला दीपिका आपल्या कुटुंबातील एक सदस्यच मानते. अनेक रिपोर्टचा दावा आहे कि जलाल दीपिकाला आपली बहिण मानतो आणि प्रत्येक वर्षी रक्षाबंधनला तो तिच्याकडून राखी बांधून घेतो. दीपिकाच्या बॉडीगार्डची सॅलरी जाणून घेतल्यावर तुम्ही हैराण व्हाल. दुसऱ्या सेलेब्सच्या बॉडीगार्डसारखे त्याची सॅलरी देखील तगडी आहे.
दीपिकाने कधीही या गोष्टीचा खुलासा केला नाही, पण अनेक मिडिया रिपोर्ट्सचा दाबा आहे कि २ ते ३ वर्षांपूर्वी त्याला ८०००००० रुपये इतकी वर्षाची सॅलरी मिळत होती. हे डीटेल्स खूप वर्षापूर्वीचे आहेत आता जलालची सॅलरी कमीत कमी १००००००० रुपये असेल.२०१८ मध्ये दीपिका-रणवीरच्या लग्नामध्ये भलेहि सर्व नातेवाईक पोहोचले नसतील पण जलाल इटलीच्या कोमो शहरामध्ये मुलींचा बाजूने उपस्थित होता. रिपोर्ट्सनुसार रणवीर आणि दीपिकाचे जेव्हा लग्न झाले होते तेव्हा जलालच वेन्युच्या सिक्युरिटी गार्डचा प्रमुख होता.वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर दीपिका लवकरच ८३ चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. याशिवाय दीपिका लॉकडाउन नंतर शकून बत्राच्या चित्रपटामध्ये काम करणार आहे ज्यामध्ये तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी पाहायला मिळणार आहे.